मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच मुंबईत मेळावा घेतला. मेळाव्यामध्ये देशातील आत्महत्येचा आकडा वाढला आहे, असं सांगत राज ठाकरे यांनी Indian Express चा रिपोर्ट सादर केला… काश्मीर येथे 16 लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. सगळीकडचे आकडे समोर आले आहेत, प्रत्येक राज्याचे आकडे दिले आहेत. कुठे 11 तर कुठे 42, 106, 615, मध्य प्रदेशमध्ये 15 हजार, गुजरातमध्ये 8 हजार, सर्वात मोठा आकडा महाराष्ट्रातील आहे, 22 हजार 174… शेतकरी आत्महत्या करत आहेत. विद्यार्थी आत्महत्या करत आहेत. नीटचे पेपर फुटत आहे, ज्याला आपण पूर्वीच विरोध केलेला. आज लहान मुलं पळवण्याचं प्रमाण वाढलं आहे.
खासदार आमदार जसे पळवले जात आहेत, तसे लहाण मुलं पळवली जाता आहे. मुली पळवल्या जात आहेत. त्याचे व्यापार होत आहेत, त्यांना परदेशी पाठवलं जात आहे. काही मुलींना तर वेश्याव्यवसायासाठी पाठवलं जात आहे. एवढे सगळे प्रश्न आज देशासमोर उभे असताना आमच्याकडे काय चालू आहे, आमची सत्ता टिकावी म्हणून आम्ही करोडो रुपये टाकायला तयार आहोत. आम्हाला खासदार फोडायचे आहेत, आमदार फोडायचे आहेत, नगरसेवक फोडायचे आहेत. तुमच्या मताला किंमत काय? शुन्य… असं देखील राज ठाकरे म्हाणाले…
पुढे राज ठाकरे म्हणाले, ‘तुम्ही कोण आहात कोणी नाही. रांगेत उभे राहा. मेंढरासारखे मतदान करा आणि मोकळे व्हा… आज भाजपकडून सुरु आहे, उद्या दुसऱ्या पक्षाकडून सुरु होईल. या पळवा-पळवीच्या राजकारणात आपण मुलभूत गोष्टी विसरत आहोत…’, असं देखील राज ठाकरे म्हणाले…
लाडक्या बहिणींवरून राज ठाकरे यांची सरकारवर टीकालाडकी बहीण योजना आणली मी तेव्हाच सांगत होतो, महिलांच्या सक्षमिकरणाकडे जास्त लक्ष द्या, त्यावर पैसे खर्च करा. महिलांना पैसे देण्याची गरज नाहीये. दीड हजार रुपये देतात, महिन्याला ते दीड हजार जातात कुठे बघून घ्या… फुकट कोणतीही गोष्ट दिल्यानंतर राज्य चालू शकत नाही. देश चालू शकत नाही. 1 रुपया द्यायचा आणि 100 रुपये ओरबाडून घ्यायचे… हे गणित आपण कधी मांडणार आहोत की नाही? कोण सत्तेत आहे याच्याशी मला मतलब नाही, आपण काय देशाचं वाटोळं करत आहोत. असं देखील वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आहे.