शेगाव: सालाबादप्रमाणे यंदाही श्री संत गजानन महाराजांची पालखी आषाढी एकादशी महोत्सवात सहभागी होण्यासाठी श्री क्षेत्र पंढरपूर कडे रविवारी (ता. २१) सकाळी ७ वाजता मंदिरामधून सातशे वारकऱ्यांसह अभंग गायन व टाळ मृदंगाच्या गजरात प्रस्थान करणार आहे.
श्रींच्या पालखी पायी वारीचे यंदा ५७ वे वर्ष आहे. या पालखी समवेत ७०० हून अधिक वारकरी, रथ, अश्व, मेणा इत्यादी सह व्यवस्थेसाठी साहित्य घेऊन ट्रक, पाण्याचे टँकर, वैद्यकीय चमू वाहन यासह अन्य लवाजम्यासह मोठा ताफा राहणार आहे.
Yoga Day Wishes in Marathi: योग म्हणजे स्वतःशी जोडणारा सर्वात सुंदर संवाद! योग दिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना पाठवा खास मराठी शुभेच्छा आणि प्रेरणादायी संदेश!टाळकरी, वारकरी, पताकाधारी, श्रीहरी नामाच्या व टाळ मृदंगाच्या गजरात जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल, जय गजानन श्री गजानन, गण गण गणात बोते, मंत्राचा नाम जप करीत वारकरी संतनगरीतून श्री विठ्ठलाच्या पंढरीकडे प्रस्थान करणार आहेत. श्रींची पालखी संतनगरी शेगावातून निघाल्यानंतर २१ जून रोजी दुपारी श्री क्षेत्र नागझरी येथील श्री संत गोमाजी महाराज संस्थान मध्ये श्रींची पालखी पोचणार आहे.
महाप्रसाद घेऊन सायंकाळी अकोला जिल्ह्यातील पारस येथे श्रींच्या पालखीचा रात्रीचा मुक्काम राहील. २२ जून रोजी पारस येथून निघून दुपारी गायगाव येथे तर रात्री भौरद येथे श्रींच्या पालखीचा मुक्काम राहील. रोजी सकाळी भौरद येथून निघून अकोला येथे २३ व २४ जून असा दोन दिवस श्रींच्या पालखीचा मुक्काम राहील. त्यानंतर सुनिश्चित मागनि श्रींची पालखी २३ जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पालखी पोहोचणार आहे. तेथील महोत्सवात सहभागी श्रींची पालखी २८ जुलै नंतर परत शेगावकडे निघणार आहे. १८ ऑगस्ट रोजी खामगाव मुक्कामी नंतर १९ ऑगस्ट बुधवार रोजी श्रींची पालखी संतनगरी शेगावला पोहोचणार आहे.
Bulandshahr Kachori : चव अशी की विसरणार नाही! सकाळच्या नाश्त्यातली ही कचोरी आता पोहोचली परदेशात; बुलंदशहरची भन्नाट कहाणी असा आहे पालखीचा प्रवासतब्बल ३३ दिवसांचा पायी प्रवास व ७५० किमी चे अंतर कापून श्रींची पालखी २३ जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूरला पोहोचणार आहे. तेथे ता. २३ ते २८ जुलै पर्यंत श्री गजानन महाराज संस्थान च्या शाखेत श्रींच्या पालखीचा पाच दिवस मुक्काम राहणार. २९ जुलै रोजी पालखी परतीच्या प्रवासाला निघेल . पंढरपूर ते शेगाव हा ५५० किमी चा प्रवास होईल असा जाण्या येण्याचा १३०० किमीचा पायी प्रवास श्रींच्या पालखीतील वारकरी भक्ती भावाने आनंदात करणार आहेत.