Maharashtra Education: माध्यम, विषय अन् कॉलेज बदलता येणार; अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांबाबत शिक्षण संचालनालयाचा निर्णय
esakal June 21, 2026 12:45 PM

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात अकरावी, बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना माध्यम, विषय, शाखा (शास्त्रा, वाणिज्य, कला) किंवा थेट कनिष्ठ महाविद्यालय बदलण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सोमवारपासून (ता. २२) ही ऑनलाइन प्रणाली कार्यान्वित होणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Deool Band 2: ‘देऊळ बंद-२’ ची कमाई आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी; प्रवीण तरडे-कैलास वाणी, साईबाबांच्या शिर्डीत संकल्प जाहीर

या सर्व प्रक्रियेसाठी शिक्षण विभागाकडून विशेष ऑनलाइन संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. २२ जूनपासून सकाळी दहापासून अधिकृत संकेतस्थळ सुरू होईल. यामुळे विद्यार्थ्यांना अकरावीमधून बारावीमध्ये किंवा अकरावीमधून पुन्हा अकरावीमध्ये प्रवेश घेताना आपले माध्यम, विषय आणि विद्याशाखा बदलण्याची ऑनलाइन सुविधा असेल. राज्य मंडळाव्यतिरिक्त सीबीएसई, आयसीएसई किंवा परराज्यातून आलेल्या दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावीत आणि अकरावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना बारावीत राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेता येणार आहे.

पालकांची बदली झाल्यास, शासनाच्या बदली आदेशानुसार विद्यार्थ्यांना त्यांचे कनिष्ठ महाविद्यालय बदलण्याची थेट सुविधा देखील देण्यात आली आहे. तसेच इतर काही गंभीर किंवा अपवादात्मक कारणांमुळे कनिष्ठ महाविद्यालय बदलायचे असल्यास संबंधित महाविद्यालयातून आवश्यक पुराव्यांसह ऑनलाइन अर्ज करावा लागेल. हे प्रस्ताव मंजुरीसाठी विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे पाठवले जातील.

Success Story: जुन्नरच्या सिद्धीने गाठले आकाश! अवघ्या २०व्या वर्षी अमेरिकेतून कमर्शियल पायलट बनण्याचा मान, सिद्धी हाडवळेची प्रेरणादायी यशोगाथा.. बदलासाठी कारण देणे बंधनकारक

या प्रणालीत बदल करताना प्रत्येक विद्यार्थ्याला बदलाचे ठोस कारण देणे अनिवार्य राहील. ही प्रक्रिया सुलभ व पारदर्शक व्हावी म्हणून संकेतस्थळावर विद्यार्थ्यांसाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. कनिष्ठ महाविद्यालयांनी या बदलांची आपल्या स्तरावर तातडीने अंमलबजावणी करावी, असे निर्देश शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिले आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.