Parbhani Yashwadi Temple Incident : परभणीच्या मानवत तालुक्यातील यशवाडी येथील हनुमान मंदिराचा सभामंडप काल (शनिवार 20 जून) कोसळला. यामध्ये पाच जणांचा जीव गेला असून जवळपास 18 जण हे जखमी झाले आहेत. या पाच जणांचा मृत्यूला नेमकं जबाबदार कोण? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय. आज दिवसभर या अपघातग्रस्त (Parbhani Temple Accident) मंदिराचं अभियंत्यांच्या माध्यमातून स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाणार आहे. तसेच प्रांताधिकार्यांच्या माध्यमातून चौकशीही केली जाणार आहे. मंदिर परिसरात पडलेला मलबा हटवला जाणार आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. तर दुसरीकड, मंदिरात काम करणाऱ्या राजस्थानी लोकांनी सांगितले दर्शन बंद करण्याची आवश्यकता नाही, म्हणून दर्शन सुरू राहिले. अस म्हणून यशवाडीच्या विश्वस्तांनी राजस्थानी कंत्राटदारावर घटनेचे खापर फोडले आहे. (Parbhani Yashwadi Temple)
Parbhani Yashwadi Temple : काम सुरू असताना दर्शन बंद करण्याची आवश्यकता नाही, म्हणून...
दरम्यान, यात मृत्यू पावलेल्या आणि जखमींना कंत्राटदारसह मंदिर संस्थानकडून मदत देण्यात येणार आहे. परभणीच्या मानवत तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या यशवाडी मारुती मंदिर देवस्थानमध्ये काल सभामंडप कोसळला. यामध्ये 23 जण जखमी झाले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेला कंत्राटदार जबाबदार असल्याचे खापर मंदिराचे विश्वस्त स्वामी शिवेंद्र यांनी फोडला आहे. तसेच कंत्राटदार आणि त्यांच्या कामगारांनी सांगितले होते की काम सुरू असताना दर्शन बंद करण्याची आवश्यकता नाही. म्हणून आम्ही दर्शन सुरू ठेवले असल्याची माहिती मंदिराचे विस्वस्त स्वामी शिवेंद्र यांनी दिलीय. तसेच लवकरच कंत्राटदाराशी बोलून आणि मंदिर संस्थांन मृत्यू पावलेल्याच्या कुटुंबियांना आणि जखमी झालेल्यांना मदत देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
Amol Mitkari : संपुर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, जीवाशी खेळ केवळ पाच लाखापुरता मर्यादित नाही
दुसरीकडे या घटनेवर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी भाष्य करत प्रतिक्रिया दिली आहे. 'काल मानवतच्या यशवाडीत हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार सुरू असताना मंदिराचे छत कोसळून पाच भाविक ठार झाल्याची घटना अत्यंत मन खिन्न करणारी असुन मृतांच्या कुटुंबियांना पाच लक्ष रूपयाची मदत करून मृतक भाविकांना न्याय मिळणार नाही .यात मंदिर कमिटी,संबंधित ठेकेदार,संबंधित अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून संपुर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. जीवाशी खेळ केवळ पाच लाखापुरता मर्यादित नाही. माणूस मारीला' असेही अमोल मिटकरी म्हणाले.