एअर फ्रेशनर आणि मॉस्किटो रिपेलंटचे साईड इफेक्ट्स
Marathi June 21, 2026 03:25 PM

घरात, ऑफिसमध्ये सुगंध दरवळावा डास, किटकांपासूनही संरक्षण व्हावे तसेच फ्रेश वाटावे यासाठी जर तुम्ही घरात किंवा ऑफिसमध्ये एअर फ्रेशनर ,मॉस्किटो रिपेलंटचा वापर करत असाल तर ही माहीती तुमच्यासाठी आहे. कारण काही वेळासाठी सुंगध देऊन तुमचे मन प्रसन्न करणारे एअर फ्रेशनर ,मॉस्किटो रिपेलंट तुम्हाला आजारीही पाडू शकतात. कारण या दोन्हीमध्ये रसायनांचा वापर करण्यात आलेला असतो. त्यामुळे श्वासाद्वारे त्याचे कण थेट फुफ्फुसात जातात. त्यामुले तुम्हाला खोकल्याचा त्रास सुरू होऊ शकतो. तर काहींवर त्याचे गंभीर साईड इफे्ट्स देखील होतात. त्यामुळे अशा परिस्थितीत काय करावे ते प्रत्येकाला माहीत असायला हवे.

एअर फ्रेशनरचे दुष्परिणाम

काही एअर फ्रेशनरमध्ये असलेली रसायने श्वसनमार्गाला त्रास देऊ शकतात.

डोकेदुखी, चक्कर येणे किंवा मळमळ होण्याची शक्यता असते.

अॅलर्जी किंवा अस्थमाचा त्रास असलेल्या व्यक्तींमध्ये लक्षणे वाढू शकतात.

बंद खोलीत सतत वापर केल्यास हवेची गुणवत्ता कमी होऊ शकते.

मॉस्किटो रिपेलंटचे  दुष्परिणाम

कॉइल, लिक्विड वेपोरायझर किंवा स्प्रेच्या धुरामुळे डोळे, नाक आणि घशाला त्रास होऊ शकतो.

संवेदनशील व्यक्तींमध्ये खोकला, श्वास घेण्यास अडचण किंवा त्वचेची अॅलर्जी होऊ शकते.

लहान मुले, वृद्ध आणि श्वसनविकार असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी.

बंद खोलीत दीर्घकाळ त्यांचा वापर टाळावा.

सुरक्षित वापरासाठी टिप्स:
– खोलीत योग्य वायुवीजन ठेवा.
– आवश्यक तेवढ्याच प्रमाणात वापर करा.
– नैसर्गिक पर्यायांचा विचार करा, जसे की स्वच्छता राखणे, मच्छरदाणी वापरणे आणि डासांची पैदास रोखणे.
– उत्पादनावरील सूचना काळजीपूर्वक वाचा आणि त्यानुसार वापर करा.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.