बेस्ट संपावर तोडगा काढण्यासाठी हालचालींना वेग; कृती समितीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक; मुंबईकरांची चिंता मिटणार?
इशान देशमुख June 21, 2026 04:43 PM

Best Bus Strike: मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर अखेर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नांना वेग आला आहे. बेस्ट कृती समितीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सह्याद्री अतिथी गृहावर बैठक होणार आहे. यावेळी मंत्री प्रताप सरनाईक देखील उपस्थित राहणार आहेत. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर याआधी प्रशासन आणि कृती समितीमध्ये चर्चा झाली होती, मात्र अंतिम निर्णयासाठी कृती समितीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची भूमिका घेतली होती. त्यानुसार आता ही महत्त्वाची बैठक पार पडत आहे. (BEST Strike Update)

या बैठकीमध्ये बेस्ट कर्मचाऱ्यांच्या (BEST Employees Strike) मागण्यांवर नेमका काय निर्णय होतो, संप मागे घेण्याबाबत कृती समिती सकारात्मक भूमिका घेते का, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे सार्वजनिक वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून, सोमवारी कार्यालयीन दिवस असल्याने तोडगा निघणे महत्त्वाचे मानले जात आहे.

बेस्ट संपाचा तिढा कायम; NEET परीक्षेच्या पार्श्वभूमीवर MSRTC धावणार मदतीला, 160 बसची व्यवस्था

मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यात राज्य सरकारला अद्याप यश आलेले नाही. संपाचा आज तिसरा दिवस असून रविवारी होणाऱ्या NEET परीक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी बेस्ट प्रशासनाने राज्य परिवहन महामंडळाची म्हणजेच MSRTC ची मदत मागितली आहे.

बेस्टच्या बससेवेवर परिणाम झाल्याने मुंबईकरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच NEET परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचताना अडचणी येऊ नयेत यासाठी MSRTC कडून मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. MSRTC कडून बेस्टच्या मार्गावर चालवण्यासाठी 100 अतिरिक्त बस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच NEET परीक्षेच्या केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी आणखी 60 बसची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, बेस्ट कृती समिती आणि प्रशासनामधील चर्चेत अद्याप अंतिम तोडगा निघालेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. संप कायम राहिल्यास मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीवर आणखी परिणाम होण्याची शक्यता आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप; प्रमुख मागण्या नेमक्या काय? (BEST employees strike, What exactly are the key demands)

- बेस्ट सेवांचे कंत्राटीकरण थांबवा

-बेस्ट मालमत्तांचा पीपीपी तत्वावर पुनर्विकासाला विरोध

- बेस्टचा स्वतंत्र अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करा

-निवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी एकरकमी द्या

-कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या तातडीने सोडवा

संपाचा मुंबईकरांना फटका; बेस्ट संपामुळे मुंबईकरांच्या अडचणी वाढणार?

-बस सेवा विस्कळीत होण्याची शक्यता

-लाखो प्रवाशांना प्रवासासाठी अडचणी

-पर्यायी वाहतुकीवर ताण वाढणार

-वीज विभागावर परिणामाची शक्यता

-वीजपुरवठा व्यवस्थेवर परिणाम होण्याची भीती

-मुंबईतील वाहतूक आणि दैनंदिन व्यवहारांवर परिणाम

इतर महत्वाच्या बातम्या 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.