या चित्रपटाने आता रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटालाही मागे टाकलं आहे. ‘सॅकनिल्क’ने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटाने प्रदर्शनाच्या 31 व्या दिवशी 1.10 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर नेट कलेक्शनचा आकडा 90 लाख रुपये आहे. 336 शोजमध्ये 32 टक्के ऑक्युपन्सीसह या चित्रपटाने एवढी कमाई केली आहे.
‘देऊळ बंद 2’ या चित्रपटाने आतापर्यंत एकूण 83.58 कोटी रुपयांचं ग्रॉस कलेक्शन केलं आहे. तर नफ्याची टक्केवारी 612% इतकी आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 2.89 कोटी रुपये आणि पहिल्या आठवड्यात 30.20 कोटी रुपये कमावले. तर दुसऱ्या आठवड्यात 22.40 कोटी रुपयांची कमाई झाली. तिसऱ्या आठवड्यात 11.15 कोटी रुपयांचा व्यवसाय झाला. तर चौथ्या आठवड्यात 6.22 कोटी रुपये कमावले.
‘देऊळ बंद 2’ हा मराठीतील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. प्रवीण तरडेंच्या या चित्रपटाने आता रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ या सिनेमालाही मागे टाकलं आहे. रितेशच्या या ऐतिहासिक कथानक असलेल्या चित्रपटाच्या मराठी व्हर्जनने 70.98 कोटी रुपये कमावले होते. तर ‘देऊळ बंद 2’ने 71.18 कोटी रुपये कमावले आहेत.
‘देऊळ बंद 2’ हा चित्रपट पुढील काही दिवसांत ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटालाही मागे टाकणार असल्याचं चित्र आहे. केदार शिंदेंच्या या चित्रपटाने 76.28 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर पहिल्या क्रमांकावर नागराज मंजुळे यांचा ‘सैराट’ हा चित्रपट आहे. ‘सैराट’ने 80.97 कोटी रुपये कमावले आहेत.