ठाकरेसेनेचे बंडखोर खासदार नागेश पाटील अष्टीकर यांची बंडखोरीनंतरची पहिली प्रतिक्रिया समोर आलीय... विकासकामं करायची असतील तर सत्तेत जाणं गरजेचं आहे... कामं होत नसल्यानं अनेकांनी पक्ष सोडलाय अशी खंतही त्यांनी व्यक्त केलीय...
उद्धव ठाकरेंचा बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात दौराशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सहा खासदारांची बंडाचे निशाण फडकावले आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदारांच्या मतदारसंघांचा दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व सहा मतदारसंघात जाऊन ते पक्षाला एकसंध ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
Shiv Sena UBT news : खासदार संजय पाटील यांची कन्या ठाकरेंच्या भेटीलाशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय दिना पाटील हे बंडाच्या तयारीत आहेत. त्यांची लेक राजुल पाटील या पक्षाच्या मुंबईतील नगरसेविका आहे. यापार्श्वभूमीवर आज त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर आपण ठाकरेंसोबतच असल्याचे राजुल यांनी मीडियाशी बोलताना सांगितले.
खासदारांच्या बंडखोरीविरोधात माकप आक्रमकशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सहा बंडखोर खासदारांविरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. हा जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा विश्वासघात असल्याचे स्पष्ट करत माकपच्या नेत्यांनी संबंधित खासदारांविरोधात राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
Yoga Day news : आजारांना दूर ठेवण्यासाठी योग हा रामबाण उपायजीवनशैलीमध्ये झालेल्या बदलांमुळे सध्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. या आजारांना दूर ठेवण्यासाठी योग हा रामबाण उपाय आहे. त्यामुळे नियमित योग करून जीवनशैलीविषयक आजारांना दूर ठेवले पाहिजे, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागतिक योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात योगाचे महत्त्व अधोरेखित केले. मुंबईतील जुहू बीचवरील फूड कोर्ट जवळ आयोजित १२ व्या जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
अमित शाह सुप्रीम कोर्टाचे प्रमुख झाले आहेत का? - राऊतांचा सवाल"अमित शाह शिवसेना प्रमुखांचा आणि शिवसेनेचा अपमान करत आहेत. शिंदेंना उल्लेख करणं म्हणजे त्यांनी हा मराठी माणसाचा अपमान केला आहे. एकनाथ शिंदे ही अमित शाह यांची टेस्टट्यूब बेबी आहे. या बेबीला 4 वर्ष झाली आहेत. शाह सुप्रीम कोर्टाचे प्रमुख झाले आहेत का? तुमच्या दबावामुळे सुप्रीम कोर्ट निर्णय देत नाही. त्यांच्या दबावामुळेच पक्षाचे चिन्ह आणि नाव निवडणूक आयोगाने शिंदेना दिलं आहे. अमित शाहांच्या पोटातलं विष ओठावर आलं. शिवसेना प्रमुखांची जागा घेण्याची प्रेरणा अमित शाह यांनी एकनाथ शिंदेंना दिली आहे, अशा शब्दात संजय राऊतांनी अमित शहांच्या कालच्या वक्तव्यावरून हल्लाबोल केला आहे.
नुसत्या चर्चेनं मी ३ दिवसात वाईट होत असेल तर खरंच वाईट आहे - ओमराजेओमराजे ज्यांच्या उपयोगी पडलाय तो माणूस घरातल्या व्यक्तीचा उद्धार करेल असं वाटलं नव्हतं पण ते करण्यात आलं, ते मी सहन केलं. माझ्या कुटुंबानं तुमचं काय वाटोळं केलंय. माझ्या नुसत्या चर्चेनं मी तीन दिवसात वाईट होत असेल तर खरंच वाईट आहे, अशी प्रतिक्रिया ओम राजेनिंबाळकर यांनी दिली आहे.
Hormuz Strait Tensions : इराणकडून पुन्हा होर्मुझची सामुद्रधुनी बंददक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलकडून होणारे सततचे हल्ले आणि आणि शांतता करारातील अटींचे सातत्याने उल्लंघन होत असल्याचा आरोप करत इराणच्या संयुक्त लष्करी कमांडने पुन्हा एकदा होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद करण्याची घोषणा केली आहे.
ओमराजे मतदारसंघाकडे निघण्यापूर्वीच सरकारकडून वाय दर्जाची सुरक्षा बहालओमराजे निंबाळकर आज धाराशिवला जाणार आहेत. यावेळी खबरदारीचा भाग म्हणून त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.
कोल्हापूरहून जेजुरीला जाणाऱ्या मिनी बसला ट्रकची जोरदार धडक; अपघातात 2 जण ठारपुणे-बेंगलोर हायवेवर कोल्हापूरहून जेजुरीला जाणारी एक मिनी बस आणि एका ट्रकची धडक झाली. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून, पाच जण जखमी झाल्याची माहिती आहे. त
Bank accounts of TMC frozen : ममता बॅनर्जींच्या टीएमसीला आणखी एक मोठा धक्का; तीन बँक खाते गोठवलीबंडखोर तृणमूल काँग्रेसच्या आमदारांच्या तक्रारीनंतर, पक्षाच्या तीन बँक खात्यांमधून पैसे काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे, यामध्ये अंदाजे 440 कोटी रुपये आहेत. या कारवाईमुळे निवडणुकीतील पराभवानंतर ममता बॅनर्जींच्या टीएमसीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. बंडखोर पक्षाच्या आमदारांनी निधीच्या स्रोताची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
Satara Election : कराडच्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदानसातारा सांगली जिल्ह्यात कार्यक्षेत्र असणाऱ्या कराडच्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. 153 केंद्रावर मतदान होणार आहे. सहकार व संस्थापक पॅनेल मध्ये दुरंगी लढत होता आहे. कारखान्याचे 50 हजार च्या वर शेतकरी सभासद आहेत. या निवडणुकीसाठी आमदार डॉ. अतुल भोसले यांनी मतदानाचा हक्क बजावला.
Mumbai BEST strike : बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाला हिंसक वळण; काही ठिकाणी दगडफेक करत बसच्या काचा फोडल्याबेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाला हिंसक वळण लागले. संप यशस्वी करण्यासाठी काही आंदोलकांनी रस्त्यावर धावणाऱ्या बसला लक्ष्य केले. त्यानंतर धारावी, दहिसर, बांगूरनगर, दादर आदी पोलिस ठाण्यांमध्ये याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. काही ठिकाणी बसच्या टायरमधील हवा काढण्याचे प्रकार घडले. तर, काही ठिकाणी दगडफेक करून बसच्या काचा फोडण्यात आल्या.
Mumbai News : विधिमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद! "चेहरा पडताळणी पध्दती"द्वारेच प्रवेश...महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून मुंबई येथे सुरू होणार असून, यावेळी विधान भवन प्रवेशासाठी प्रथमच एकही प्रवेश पत्रिका छापण्यात येणार नसून माननीय पीठासीन अधिकारी, माननीय मुख्यमंत्री ते अधिकारी-कर्मचारी वर्ग, स्वीय सहायक, अभ्यागत अशा सर्वांसाठी विधान भवन ई-प्रवेश प्रणालीद्वारे "चेहरा पडताळणी पध्दती" अवलंबिण्यात येत आहे, अशी माहिती महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातर्फे देण्यात आली.
Nanded Crime : नांदेड शहरात वाघी रोड परिसरात मध्यरात्री युवकाचा खून; कारण समजेनानांदेड शहरातील वाघीरोड परीसरात एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली. 35 वर्षीय शेख शमीम आपल्या काही मित्रासोबत एका दुकानासमोर बोलत बसला होता. तेव्हा दुचाकीवरुन आलेल्या चारी ते पाच अज्ञात तरुणांनी पत्ता विचारला. शेख शमीम त्यांना पत्ता सांगत्त असताना त्या युवकांनी तलवार आणि धारदार शस्त्राने त्याच्यावर हल्ला केला. आरोपींनी गोळीबार केल्याची देखील माहिती आहे. या हल्ल्यात शेख शमीम यांचा मृत्यू झाला. खूनाचा कारण समजू शकले नाही , पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
Nilesh Chandra On Raj Thackeray : जैन मुनी निलेशचंद्रन यांचे मनसेप्रमुख ठाकरेंच्या टीकेला प्रत्त्युत्तर देत थेट आव्हानच दिलेदाढी फक्त वाघाला असते, आणि मला गर्व आहे कि माझा जन्म मराठी कुटुंबात झाला आहे. जैन आणि सनातन धर्मासाठी मी महाराष्ट्रभर फिरणार आहे. तुमच्या मनगटात जर दम असेल तर तुम्ही जा मुंब्रा, कल्याण, भिवंडीमध्ये. मात्र, तिथे तुम्ही जाऊ शकत नाही. मी सनातनी आहे आणि सनातनसाठीच लढणार. माझ्या समाजासाठी माझी आहुती गेली तरी मी माझ्या समाजासाठी लढत राहणार, असं म्हणत जैन मुनी निलेशचंद्रन यांनी मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्त्युत्तर देत थेट आव्हान दिले आहे.
Dharashiv News : 226 पैकी 202 प्रकल्पांनी तळ गाठला; 24 प्रकल्पात 26 ते 50 टक्के पाणीसाठा, शेतीसाठीचा पाणी उपसा बंदऐन मृग नक्षत्रात पावसाने दडी मारल्याने धाराशिव जिल्ह्यावर पाणीटंचाईचे गंभीर संकट ओढावले आहे. जिल्ह्यात सध्या केवळ 30 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे. जानेवारी महिन्यापासून दरमहा सरासरी 99 दशलक्ष घनमीटर पाण्याचा वापर होत असून सध्या विविध प्रकल्पांमध्ये एकूण केवळ 93 दलघमी पाणी शिल्लक राहिले आहे. जिल्ह्यातील 226 प्रकल्पांपैकी तब्बल 202 प्रकल्पांनी तळ गाठला असून केवळ 24 प्रकल्पांमध्ये 26 ते 50 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने शेतीसाठीचा पाणीउपसा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
Maharashtra Monsoon News : मुंबईसह संपूर्ण कोकणात पावसासाठी अनुकूल वातावरण, कधीपासून सुरु होणार पाऊस?मान्सूनबाबात दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबईत मान्सूनच्या आगमनाची शक्यता आहे. 23 जूनपासुन मुंबईसह संपूर्ण कोकणात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्मिती होणार असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिली आहे. हवामान अभ्यासक के एस होसाळीकर यांनी देखील मान्सूनबाबत महत्वाची माहिती देताना, 22 ते 23 जूनपासून दक्षिण कोकण आणि महाराष्ट्रा लगतच्या भागात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता सांगितली. हवामानाच्या मॉडेल्सनुसार, आगामी दिवसात राज्यातील बहुतांश भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस जूनच्या अखरपर्यंत राहू शकतो, असे म्हटलं आहे.