मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटाच्या बंडखोर खासदाराला मोठा झटका, राजकारणात मोठा उलटफेर, थेट..
Tv9 Marathi June 21, 2026 07:45 PM

शिवसेना ठाकरे गटामध्ये मोठी फूट पडली आहे, शिवसेना ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.  हे सर्व खासदार शिवसेना शिंदे गटात सहभागी होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. मात्र त्यानंतर आता धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढलं आहे. आपण अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही, मी मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करेल आणि मग निर्णय घेईल अशी भूमिका ओमराजे निंबाळकर यांनी घेतली आहे, त्यातच त्यांचं शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी देखील फोनवर बोलणं झालं आहे, सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी ओमराजे निंबाळकर उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे, त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढलं आहे.

दरम्यान एकीकडे ओमराजे  निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गाटचं टेन्शन वाढवलेलं असतानाच आता दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाच्या आणखी एका बंडखोर खासदाराला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे बंडखोर खासदार संजय दिना पाटील यांची मुलगी राजुल पाटील यांनी आज ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे.  या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राजुल पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. मी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहे, आता माझी आणि माझ्या वडिलांची भविष्यातील राजकीय वाटचाल वेगळी असेल, मी माझं काम पूर्णपणे निष्ठेनं करेल असं राजुल पाटील यांनी म्हटलं आहे. राजुल पाटील या शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेविका आहेत. दरम्यान राजुल पाटील यांनी घेतलेली ही भूमिका संजय दिना पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान आज संध्याकाळपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटाकडून आज ऑपरेशन टायगरसंदर्भातील पुरावा सादर केला जाण्यची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून या संदर्भात मागणी करण्यात आली होती. मात्र तरी देखील ओमराजे निंबाळकर काय निर्णय घेणार यावरच या खासदारांचं पुढचं भवितव्य अवलंबून असणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.