सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातून एक काळजाचा थरकाप उडवणारी (Solapur Crime News) धक्कादायक घटना समोर आली आहे. जाधववाडी या गावामध्ये जुन्या कौटुंबिक वादातून सख्ख्या (Solapur Crime News) भावाने आणि पुतण्याने मिळून आपल्याच भावावर कोयत्याने आणि लोखंडी रॉडने भीषण प्राणघातक हल्ला केला आहे. या रक्ताळलेल्या आणि क्रूर (Solapur Crime News) हल्ल्यात महादेव जाधव हे गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्या डोक्यात तब्बल ७ ते ८ वार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या थरारक घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.(Solapur Crime News)
मिळालेल्या माहितीनुसार, जाधववाडी येथील रहिवासी महादेव जाधव आणि त्यांच्या सख्ख्या भावामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. याच जुन्या वादाची धुसफूस मनात ठेवून काल आरोपी भाऊ आणि पुतण्याने मिळून महादेव जाधव यांना गाठले. काही समजण्याच्या आतच दोघांनी मिळून महादेव यांच्यावर लोखंडी रॉड आणि धारदार कोयत्याने सपासप वार करण्यास सुरुवात केली. हा हल्ला इतका भीषण होता की, आरोपींनी थेट महादेव यांच्या डोक्याला लक्ष्य केले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव जाधव यांच्या डोक्यात किमान ७ ते ८ गंभीर वार झाले असून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला आहे.
हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महादेव जाधव यांना तातडीने करकंब येथील 'जगताप सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल'मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, सख्ख्या भावावर जीवघेणा हल्ला करून फरार झालेल्या आरोपींचा शोध सुरू केला आहे.
माढा तालुक्यातील जुन्या कौटुंबिक वादातून भावाने व पुतण्याने सख्या भावावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. माढा तालुक्यातील जाधववाडी येथे जुन्या वादातून महादेव जाधव यांच्यावर कोयत्याने प्राणघात खाल्ला करण्यात आला. किमान सात ते आठ वार महादेव जाधव यांच्या डोक्यात असल्याचे डॉक्टरांकडून माहिती पुढे येत आहे. अत्यंत भीषण झालेल्या प्राणघात हल्ला सध्या चर्चेचा विषय बनत आहे.