Sachin Tendulkar on Lagaan Cinema: मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या (Aamir Khan) 'लगान' (Lagaan) सिनेमाला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. हा सिनेमा 2001 साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमानं प्रेक्षकांच्या (Entertainment) मनात घर तयार केलंय. क्रिकेटवर आधारीत हा सिनेमा आजही प्रेक्षकवर्ग आवर्जून पाहतात. या सिनेमातील प्रत्येक सीन्सचा प्रेक्षकवर्ग चाहता आहे. दरम्यान, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी या सिनेमाचं विशेष कौतुक केलंय. त्यांनी या सिनेमाच्या संबंधित एक खास किस्सा शेअर केला. सचिन तेंडुलकर यांनी सांगितलेला किस्सा चाहत्यांमध्ये प्रचंड व्हायरल होतोय.
'लगान' या सिनेमाला प्रदर्शित होऊन 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. या सिनेमातील सीन्स आणि डायलॉग्स आजही प्रेक्षकांमध्ये अजरामर आहेत. अलिकडेच आमिर खान प्रॉडक्शन हाऊसने एक व्हिडीओ सोशल मीडियात शेअर केला होता. या व्हिडीओत सचिन तेंडुलकर या सिनेमाच्या संबंधित एक किस्सा शेअर करत असल्याचं दिसत आहे. सचिन तेंडुलकर यांनी सांगितलं की, ते हा सिनेमा नेहमी आपल्या कुटुंबासोबत पाहतात. हा सिनेमा सचिन यांना प्रचंड आवडतो.
सिनेमा रिलीजच्या 2 वर्षांपूर्वी दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांनी, 'क्रिकेटमध्ये प्रेक्षकांचा क्राऊडचा ऑथेंटिक आवाज कुठे मिळेल?' असा प्रश्न सचिन यांना विचारला. त्यावेळी सचिन तेंडुलकर हे मुंबईत ऑस्ट्रेलियाविरोधात सामना खेळणार होते. त्यांनी वानखेडे स्टेडियममध्ये ऑडियन्सचा आवाज रेकॉर्ड करण्याचा सल्ला दिला होता. 'आम्ही संध्याकाळी जेवण करताना लगान सिनेमा पाहायचो..', हा किस्साही सचिन तेंडुलकर यांनी शेअर केला.
View this post on Instagram
याव्यतिरिक्त सचिन तेंडुलकर यांनी ए. आर रहमान आणि सिनेमातील गाण्यांची प्रशंसा केली. या सिनेमातील गाण्यांबद्दल सचिन तेंडुलकर म्हणाले, 'ओ पालनहारे' हे गाणं आजही आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी देते. लता दीदी आणि उदित नारायण यांनी उत्तम गाणं गायलं आहे. 25 वर्ष पूर्ण कशी झाली? हे कळालंच नाही'. सचिन तेंडुलकर यांनी यावेळेस 'लगान' सिनेमाला 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आशुतोष गोवारिकर आणि आमिर खानचं कौतुक केलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या: