Maharashtra News Live Update: - विधान परिषद निवडणुकीची आज मतमोजणी, निकालाकडे सर्वांचे लक्ष
Saam TV June 22, 2026 11:45 AM
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांच्या मधे थेट लढत

जळगाव विधान परिषदेचा निकाल आज लागत आहे या मधे महायुतीचा उमेदवार विजयी होणार की महाविकास आघाडी चा उमेदवार विजयी होणार या कडे सगळ्यांच लक्ष लागले आहे.

जळगाव विधान परिषदेची निवडणूक महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन आणि महा विकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांच्या मधे चुरशीची होईल असे चिन्हे असताना, अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला होता तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाच्या रेशमा काळे यांनी बंडखोरी केल्याने ही निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय बनली होती.

Maharashtra News Live Update: - विधान परिषद निवडणुकीची आज मतमोजणी, निकालाकडे सर्वांचे लक्ष

छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या निवडणुकीची आज मतमोजणी होणार आहे. सकाळी ८ वाजल्यापासून रेल्वे स्टेशन रोडवरील शासकीय औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयात ही मतमोजणी होत आहे. चार टेबलवर ही मतमोजणी होणार असून त्यासाठी ६५ अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकूण ६३७ मतदारांपैकी ६३० जणांनी मतदान केले. निवडणूक रिंगणात महायुतीचे सुहा शिरसाठ, महाविकास आघाडीचे गणे लोखंडे तर अपक्ष इसाक खान तीन उमेदवार असले तरी खरी लढत शिरसाठ आणि लोखंडे यांच्यातच होत असल्याचे दिसून येत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.