मुंबईत बेस्ट बस सेवा पुन्हा सुरू, कर्मचाऱ्यांच्या मागण्या सरकारकडून मान्य
Webdunia Marathi June 22, 2026 05:45 PM

बेस्टचे कर्मचारी गेल्या तीन दिवसांपासून अनिश्चित काळासाठी आपल्या मागण्यांना घेऊन संपावर होते. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कामगार संघटनेतील झालेल्या बैठकीनंतर बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे. 

ALSO READ: 'ऑपरेशन टायगर' यशस्वी! उद्धव ठाकरेंचे ६ खासदार शिंदे गटात का गेले? जाणून घ्या संख्याबळाचा खेळ

सरकारने मेस्मा लावल्यावर देखील संप सुरु होता. या संपामुळे गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतील बस सेवांवर गंभीर परिणाम झाला होता.या संपात बेस्टचे कायमस्वरूपी आणि तात्पुरते कर्मचारी, तसेच वेट-लीज ऑपरेटर्सचे बहुतांश कर्मचारी सामील होते. शनिवारी, आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मेस्मा ( महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा) अंतर्गत नोटिसा पाठवण्यात आल्या.  

ALSO READ: Mumbai Weather Today मुंबईत पावसाची दमदार हजेरी! 'या' भागांमध्ये कोसळल्या जोरदार सरी, IMD कडून वीज चमकण्यासह वादळी वाऱ्याचा इशारा

रविवारी सह्याद्री गेस्टहाऊस मध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सचिन अहिर आणि मुर्जी पटेल, बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) आयुक्त अश्विनी भिडे, बेस्टच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी आणि युनियन प्रतिनिधी उपस्थित होते. 
 

 शिंदे यांनी बैठकीत जाहीर केले की, करारानुसार नवीन वेतन करार होई पर्यंत बेस्ट कर्मचाऱ्यांना दरमहा3000 रुपयांची अंतरिम वेतनवाढ मिळेल, तर वेट लीज ऑपरेटरच्या कर्मचाऱ्यांना दरमहा 2000 रुपये मिळतील.  

ALSO READ: मुंबईतील बेस्ट बस सेवा थांबली! कर्मचाऱ्यांचा अनिश्चित काळासाठी संप सुरू, सरकारने मेस्मा लागू केला

तसेच बेस्ट प्रशासनाला चालू आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांची थकीत ग्रँच्युइटी देऊन संप मागे घेत तात्काळ बस सेवा पुन्हा सुरु करण्याचे निर्देश दिले. त्यांना बेस्ट प्रशासनाची प्रस्तावित पुनरुज्जीवन योजना लवकरच राज्य सरकारकडे सादर केली जाईल आणि मंजुरीसाठी मंत्रिमंडळासमोर ठेवली जाईल. असे आश्वासन देखील देण्यात आले.  

Edited By - Priya Dixit

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.