नवी मुंबई हादरली! दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींना ढकलले वेश्याव्यवसायात; शिंदेसेना आणि भाजप नेत्याला बेड्या
Saam TV June 22, 2026 06:45 PM

विकास मिरगणे, नवी मुंबई प्रतिनिधी

Navi mumbai crime : नवी मुंबईतील उलवे येथील अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायात ढकलल्या प्रकरणात पेण येथील शिवसेना (शिंदे गट) स्वीकृत नगरसेवकासह भाजपच्या एका माजी नगरसेवकाला अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे रायगड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

रेल्वे पोलिसांची लॉजवर धाड

१७ जून रोजी रेल्वे पोलिसांनी उलवे परिसरातील एका लॉजवर छापा टाकून १४ आणि १७ वर्षांच्या दोन सख्ख्या बहिणींची वेश्याव्यवसायातून सुटका केली होती. या दोन्ही अल्पवयीन बहिणींना पैशांचे आमिष दाखवून या दलदलीत ढकलण्यात आले होते. याप्रकरणी उलवे पोलिसांनी आतापर्यंत एकूण चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

Beed : 'जिवंत सोडणार नाही' म्हणत तरुणावर तलवारीने सपासप वार; बीडमधील खळबळजनक घटना

आजी-माजी नगरसेवकांचा समावेश

पोलिसांच्या तपासादरम्यान या गुन्ह्यात पेण येथील शिवसेना (शिंदे गट) स्वीकृत नगरसेवक उपेंद्र कोलाडकर आणि भाजपचे माजी नगरसेवक कुणाल नाईक यांच्यासह त्यांच्या अन्य दोन साथीदारांचा सहभाग समोर आला. त्यानंतर पोलिसांनी या चौघांनाही अटक केली.

मोठी बातमी! ठाकरेंनी खासदाराच्या मुलाची केली पक्षातून हकालपट्टी, राऊतांच्या पोस्टने राजकारणात खळबळ

२४ जूनपर्यंत पोलीस कोठडी

अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींवर पॉक्सो (POCSO) कायदा, अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा (PITA) तसेच भारतीय न्याय संहितेअंतर्गत (BNS) विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. न्यायालयाने सर्व आरोपींना २४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Ladaki Bahin Yojana : या लाडक्या बहि‍णींनाच यापुढे ₹१५०० मिळणार, आचारसंहितेतही खात्यावर येणार पैसे, वाचा
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.