संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही
कल्याणमध्ये अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादाय घटना घडली आहे. या प्रकरणात कोळसेवाडी पोलिसांनी दोन आरोपीना बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे हे दोघे साठ वर्षाचे आहेत.
Mumbai-Pune Expressway:मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर ३ वाहनांचा विचित्र अपघात, २ जणांचा जागीच मृत्यू; मिसिंग लिंकवर वाहतूक ठप्पकल्याण पूर्व येथील कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका परिसरात एका घरातून एका मुलीचा जोरात आवाज आला. मुलीचा ओरडाओरड सुरू असताना आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना जाग आली. लोकांनी याची माहिती कोळसेवाडी पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर अतिशय धक्कादायक माहिती समोर आली.
Pune Crime News : दिवसाढवळ्या गोळीबार, पुण्यातील पाटस हादरलं; दोन गटांतील वादानंतर तुफान हाणामारीहे दोघे आरोपी रात्री घरात एक पंधरा वर्षाची मुलगी घेऊन आले होते. त्यामधील एक आरोपी चहा विक्रीच्या व्यवसाय करतो आणि एक आरोपी हा रिक्षा चालक आहे. मुलगी गरीब घरची आहे. तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. आता या प्रकरणात या दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोघांनी याआधी यामुली सोबत किंवा आणखी काही मुली सोबत असा प्रकार केला आहे का? त्याच्या या प्रकारात किती लोक आहेत? याचा तपास आता पोलीस करीत आहेत. मात्र या घटनेमुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे