त्यानंतर आता तसाच प्रकार टी 20i वुमन्स वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत पाहायला मिळालाय. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा पहिला पराभव झालाय. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला पराभव भारतीय संघासाठी वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्याबाबत तिसऱ्यांदा लकी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)
त्यानंतर मेन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतही दक्षिण आफ्रिकेने भारताला पहिल्यांदा पराभूत केलं. मात्र त्यानंतर टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात वर्ल्ड कप जिंकल्याचं क्रिकेट विश्वाला माहित आहे. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)
आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत टीम इंडियाला रविवारी 21 जून रोजी पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. दक्षिण आफ्रिकेने भारतावर 6 विकेट्सने विजय मिळवला. भारताला हा सामना जिंकून सेमी फायनलमधील आपलं स्थान आणखी मजबूत करण्याची संधी होती. मात्र आता भारतासाठी जर तरचं समीकरण तयार झालं आहे. तर भारतासाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पराभव शुभसंकेत मानला जात आहे. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)
वुमन्स टीम इंडियाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदा पराभूत केलं होतं. त्यानंतर भारतीय महिला संघाने पहिल्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)