आत्महत्या केलेल्या मुलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी श्रद्धांजली सभा
मेणबत्ती पेटून जंतर मंतर वर वायली जाणार श्रद्धांजली
पोलीस मेणबत्ती मैदानावर आणू देत नाहीत
परीक्षा दिलेले विद्यार्थी व्यासपीठावर दाखल
नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरीनाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी सर्वदूर पावसाने हजेरी लावली कुठे जोरदार तर कुठे मध्यम स्वरूपात पाऊस बरसला,नाशिकच्या चांदवड मध्ये जोरदार पाऊस झाल्याने पहिल्याच पावसात रेणुका कॉम्प्लेक्स परिसरात सर्वत्र पाणीच पाणी साचले त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली,तर शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले,दरम्यान चांदवड परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे बळीराजाच्या कामांना वेग येणार आहे.
पहिल्याच पावसात चंद्रपूर महापालिकेचे पितळ उघडे: बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. मात्र पहिल्याच पावसात चंद्रपूर महानगरपालिकेच्या पावसाळापूर्व तयारीचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. शहरातील श्री टॉकीज चौक, एसबीआय बँक परिसर, पटेल शाळा तसेच एलटीव्ही शाळेजवळ व तुकूम परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला. दुसरीकडे ग्रामीण भागात या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून पेरणीच्या कामांना वेग येण्याची आशा व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागासाठी हा पाऊस वरदान ठरत आहे.
सहा खासदारांमुळे शिवसेना अधिक बळकट होईल- शिंदेसहा खासदारांचे एकनाथ शिंदेंनी स्वागत केलं. त्यांचा शिवसेनेत प्रवेश झाल्याने शिवसेना अधिक बळकट होईल असं शिंदे म्हणालेत.
आता चौकार नाही तर षटकार मारला-एकनाथ शिंदेवाय. बी सेंटरमध्ये सहा खासदार शिंदेसेनेत प्रवेश करत आहेत. त्यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी खासदारांचं कौतुक केलं. आता मी चौकार नाही षटकार मारला असं शिंदे म्हणालेत.
खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शिर्डीतील कार्यालयावरील बॅनर हटवलेवाकचौरे यांच्यासह सहा फुटीर खासदारांचा काही वेळेतच शिंदे सेनेत पक्षप्रवेश.
तत्पूर्वी शिर्डीच्या कार्यालयावरील बॅनर हटवले
काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे. संजय राऊत यांचे फोटो असलेले बॅनर हटवले.
फुटीर खासदार वाय.बी सेंटरकडे रवाना, थोड्याच वेळात करणार शिंदे गटात प्रवेशफुटीर सहा खासदार आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. हा पक्षप्रवेश सोहळा मुंबईतील वाय. बी सेंटरमध्ये होणार आहे.
Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये उसाचे बिल वेळेत न मिळाल्याने शेतकरी आक्रमकछत्रपती संभाजीनगर -
उसाचे बिल वेळेत न मिळाल्याने शेतकरी आक्रमक
पैठणच्या श्री संत एकनाथ कारखान्याने थकवले शेतकऱ्यांचे बिल
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घुसून शेतकऱ्यांसाठी आंदोलन सुरू
Nandurbar: नंदुरबार परिसरात बिबट्याचा थरार, महिलेवर जीवघेणा हल्लानंदुरबार -
खांडबारा परिसरात बिबट्याचा थरार
महिलेवर जीवघेणा हल्ला
वनाधिकाऱ्यांच्या केवळ सल्ल्यामुळे गावकरी संतप्त
सरपण गोळा करणाऱ्या अजिता नाईक या 45 वर्षीय महिलेवर बिबट्याचा हल्ला
महिलेच्या आरडाओरडीमुळे स्थानिक नागरिक धावून आल्याने बिबट्याने पळ काढला
Nashik: नाशिकमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासानाशिक जिल्ह्यात आज दुपारनंतर येवला, नांदगाव, लासलगाव, निफाड, चांदवडसह काही भागात विजांचा गडगडाट,वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली.
त्यामुळे हवेत गारवा निर्माण होऊन उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
तर बळी राजा सुखावला असून अजून जोरदार पाऊस झाल्यास जमिनीत पाणी मुरून पेरण्यांच्या कामाला सुरुवात करता येईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे
Nashik: गोकुळ गीते ओझर विमानतळाच्या दिशेने रवानानाशिक -
- गोकुळ गीते ओझर विमानतळाच्या दिशेने रवाना
- ओझर विमानतळावरून विशेष विमानाने थोड्याच वेळात मुंबईला रवाना होणार
- शिंदे सेनेचे आमदार किशोर पाटील यांच्यासोबत गोकुळ गीते ओझर विमानतळावरून मुंबईला रवाना होणार
- आज संध्याकाळीच मुंबईत गोकुळ गीते शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता, सूत्रांची माहिती
Parbhani: खासदार संजय जाधव यांचे समर्थक नांदेडकडे रवानापरभणी -
खासदार संजय जाधव यांचे समर्थक नांदेडकडे रवाना
खासदार संजय जाधव हे नांदेडच्या एअरपोर्टला पाच वाजता येणार असल्यामुळे स्वागतासाठी खासदार समर्थक नांदेड कडे रवाना
परभणी जिल्ह्यातील खासदार समर्थक खासदारांच्या स्वागतासाठी गाड्यांचा ताफा नांदेडकडे
खासदार संजय जाधव आज परभणीत होणार दाखल
Baramati: बारामतीच्या पूर्व भागात पावसाची हजेरीबारामती - बारामतीच्या पूर्व भागात पावसाची हजेरी
बारामतीच्या पूर्व भागात डोलवाडी झारगडवाडी सोनगाव मेखळी पिंपळी काटेवाडी या परिसरात आज दुपारी पावसाने हजेरी लावली
अचानक जोराचा वारा आला आणि काही वेळातच पावसाला सुरुवात झाली अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली
अनेक दिवसापासून शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे त्यातच आज वरून राजाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे
सुमारे अर्धा तास या भागात पावसाने हजेरी लावली
दक्षिण रायगडमध्ये पावसाच्या जोरदार सरीढगांच्या गडगडाटासह पावसाच दक्षिण रायगडमध्ये आगमन
महाड, माणगाव, पोलादपुरमध्ये ढगाळ वातावरणसह उन पावसाचा खेळ सुरु
शिरपूर शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी वादळी वारासह पावसाला सुरुवातआभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे मिळणार मोठा दिलासा
उकाड्या पासून हैराण झालेल्या नागरिकांना देखील अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने मिळाला उकाडापासून काहीसा दिलासा
या पावसामुळे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण
आमदारांसोबतच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे मुंबईतील शिवालयात दाखलउद्धव ठाकरे बैठकीसाठी मुंबईतील शिवालय येथे पोहचले आहेत. खासदारांनंतर आमदारही बंड करणार असल्याचा दावा शिंदेंच्या शिवसेवेकडून केला जात आहे. त्यामुळे त्यांचं म्हणणं जाणून घेण्यासाठी ठाकरेंनी ही बैठक बोलवली आहे. आज ६ खासदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत
पंढरपूरात विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवर करण्यात येणाऱ्या रासायनिक प्रक्रियेस न्यायालयाची स्थगितीश्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीच्या जतन संवर्धनास पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाने याबाबत याचिका दाखल केली होती.
श्री विठ्ठल रुक्मिणी च्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली आहे वारकऱ्यांच्या भावनेनुसार मूर्ती मध्ये प्राण आहेत त्यामुळे या मूर्तीला रासायनिक लेप लावणे चुकीचा आहे. त्यामुळे महाराष्ट्र मंदिर महासंघाने पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयात लेपन प्रक्रिया थांबवण्याबाबत याचिका दाखल केली होती. आज या याचिकेचा निकाल आला असून पुढील आदेश येईपर्यंत ही ले पण प्रक्रिया करू नये असे न्यायालयाने म्हटले आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान कीअर स्टार्मर यांचा राजीनामाब्रिटनचे पंतप्रधान कीअर स्टार्मर यांनी लेबर पक्षाच्या नेतृत्वाचा राजीनामा जाहीर केला आहे.
“माझा पक्ष संपला आहे, असे वारंवार सांगितले गेले. जनतेचा संदेश मी ऐकला आहे,” असे म्हणत स्टार्मर यांनी पद सोडण्याची घोषणा केली.
पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात मान्सून दाखलपुण्यासह, अलिबाग, धाराशिव, सोलापूर सारख्या जिल्ह्यांसह राज्याच्या पूर्व भागात मॉन्सून पोहचला आहे अशी माहिती पुणे वेधशाळाने आज दिली. कोकण किनारपट्टीवर सुद्धा पाऊस पडताना दिसतोय. येणाऱ्या ४८ तासांमध्ये मुंबईत मॉन्सून दाखल होईल तर २६ जून नंतर राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये मॉन्सून पोहचेल असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.
भिवंडीत अर्धवट काम केलेल्या उघड्या गटारात महिला पडली, सीसीटीव्ही फुटेज व्हायरलभिवंडी शहरात पावसाळ्याच्या तोंडावर अनेक विकास काम अर्धवट असताना धामणकर नाका येथील अमृत हॉस्पिटल समोरील काँक्रिट रस्ता बनविल्यानंतर शेजारील गटार न बनविल्याने रस्त्य लगतच्या मेडिकल दुकानात औषध खरेदी करण्यासाठी गेलेल्या महिलेचा अर्धवट गटारी मध्ये पाय पडल्याने उघड्या गटारीत महिला पडल्याची घटना घडली आहे.हा प्रकार मेडिकल दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.
पैठणमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन; कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आक्रमक भूमिकापैठणमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वतीने सरकारविरोधात भीक मागो आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी अर्ध लग्न होत सरकारविरोधात घोषणाबाजी करत कर्जमाफी, पिकांचे नुकसानभरपाई आणि शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली.
सहा बंडखोर खासदार मुंबईत दाखलसहा बंडखोर खासदार मुंबईत दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात शिंदेसेनेत करणार प्रवेश
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढील सुनावणी उद्या 23 जून रोजी- सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढील सुनावणी उद्या 23 जून रोजी.
- आरोपीच्या वकिलांकडून टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज ची मागणी.9 /12 चे टोल नाक्यावरील फुटेज द्या
- आरोपीच्या वकिलांना सीसीटीव्ही फुटेज 10/04/2025 रोजी दिले आहे. सरकारी पक्षाकडून मांडणी.
पिंपरी चिंचवड शहरात मानसूनच्या रिमझिम पावसाला सुरुवातपिंपरी चिंचवडकरांची प्रतीक्षा अखेर संपली असून पिंपरी चिंचवड शहरात आज दुपारी मान्सूनचा आगमन झाला आहे.. आज सकाळपासूनच पिंपरी चिंचवड शहरात ढगाळ वातावरण होतं. त्यानंतर दुपारी एक वाजता दरम्यान पिंपरी चिंचवड शहरातील बहुतांश भागात मान्सूनच्या रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे.
लोणावळ्यात पावसाची दमदार हजेरीपर्यटन नगरी लोणावळ्यात अखेर मान्सूनच्या पावसाने दमदार हजेरी लावली असून जून महिन्याच्या सुरुवातीपासून दडी मारून बसलेला पाऊस पुन्हा एकदा बरसू लागला आहे. त्यामुळे लोणावळ्यातील नागरिकांसह चिक्की व्यावसायिक आणि पर्यटन व्यवसायाशी संबंधित घटकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्मार्ट मीटरवरून लोणावळयात नागरिक-व्यापारी रस्त्यावरलोणावळ्यात स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात जनआक्रोश तीव्र होताना दिसत आहे. व्यापारी वर्गासह; नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले असून महावितरणच्या कारभाराविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
तुम्हाला जिवंत सोडणार नाही' म्हणत पाठलाग करत तरुणावर तलवारीने जीवघेणा हल्ला; बीडमधल्या कुंबेफळ येथील खळबळजनक घटना...भांडण सोडविल्याचा जुना राग मनात धरून 04 जणांच्या टोळक्याने कुंबेफळ येथील एका तरुणावर बॅटने, तर त्यानंतर पाठलाग करून फिर्यादीवर तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना अंबाजोगाई - कारखाना रोडवर असलेल्या सितारा टॉकीज जवळ घडली आहे.
बारामतीतील उजनी धरणात पंचवीस टक्के पाणीसाठा वजाशेतकऱ्यांसाठी जीवनदायनी ठरलेलं उजनी धरण आजच्या स्थितीला वजा 25 टक्क्यामध्ये गेलेल आहे. उजनीत सध्या एकूण पाणी साठवण क्षमतेच्या वजा 49 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. सध्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पश्चिम घाट माथ्यावर पावसानं ओढ दिली आहे त्यामुळे उजनी वर अवलंबून असलेल्या पुणे जिल्हा सह सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढलीय.
सांगली-सातारा विधान परिषद विजयी उमेदवार धैर्यशील कदमसांगली-सातारा विधान परिषद विजयी उमेदवार धैर्यशील कदम
निकाल लागला आहे,सांगली-सातारा विधान परिषद निवडणूकीत पक्ष आणि मित्र पक्षांनी संधी दिली.
मला मतदान केलेल्या मतदारांचे मी मनापासून आभारी आहे.
उमेदवारी निश्चित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वास टाकला
भाजपकडून शिंदे गटाचा विश्वासघात..? जळगावमध्ये साथ देऊनही नाशिकमध्ये दगाफटका?भाजपकडून शिंदे गटाचा विश्वासघात..? जळगावमध्ये साथ देऊनही नाशिकमध्ये दगाफटका?
आम्हीही जळगाव जिंकलो असतो आम्ही धर्म पाडला, बंडखोरी भाजपाची रेश्मा काळे यांचा आरोप
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गावरील पहिला टप्पा जून अखेरपर्यंत पूर्णत्वासहिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गावरील माण ते बालेवाडी हा पहिला टप्पा जून अखेरपर्यंत पूर्णत्वास जाणार
बालेवाडी ते जिल्हा न्यायालय हा उर्वरित टप्पा ऑगस्ट पर्यंत पूर्ण होणार
पहिल्या टप्प्यात १२ स्थानकावरून मेट्रो धावण्याचा मार्ग मोकळा
शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान प्रवासाचा वेळ ४५ मिन पर्यंत कमी होणार
भारत-अमेरिका व्यापार करारावर आज दिल्लीत चर्चाभारत-अमेरिका व्यापार करारावर आज दिल्लीत चर्चा
अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमीसन ग्रीर व्यापार करारावर चर्चा करण्यासाठी भारत दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अंतरिम व्यापार कराराला पुढे नेण्यासाठी ही भेट
Nashik : मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवलानाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा 100 हून अधिक मतांनी पराभव झाला
दरम्यान माझ्या पराभवाला महायुतीचे नेते जबाबदार असून त्यांनी माझा घात केला आहे यात मंत्री गिरीश महाजन, मंत्री छगन भुजबळ यांच्यावर थेट आरोप करण्यात आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून येवल्यात मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालय बाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
Sambhajinagar : भाजपचे सुहास शिरसाट यांच्या विजयानंतर भाजपचा जोरदार जल्लोषभाजपचे सुहास शिरसाट यांच्या विजयानंतर भाजपचा जोरदार जल्लोष
महायुती आणि भाजप कार्यकर्त्यांकडून फटाके फोडत, गुलाल उधळत जल्लोष
अमरावती विधानपरिषद निवडणुकीतत सलग तिसऱ्यांदा भाजपचे प्रवीण पोटे विजयीअमरावती विधान परिषद निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा भाजपचे प्रवीण पोटे विजय
प्रवीण पोटे 390 मत घेऊन विधानपरिषद निवडणुकीत विजयी
प्रवीण पोटे निवडून येतात अप्रत्यक्षपणे रवी राणांवर केली टीका
4 मते वंचितची तर 27 मते कोणाची याचा शोध घ्या प्रवीण पोटे यांचा रवी राणा यांना अप्रत्यक्षपणे टोला
Gokul Gite : नाशिक विधानपरिषद निवडणुकीत गोकुळ गीते यांचा विजयनाशिकमध्ये गोकुळ गीते यांचा विजय
गोकुळ गीते यांना ३५७ मतं मिळाली असून १०७ मतांनी ते विजयी झाले आहेत.
भंडारा - गोंदिया विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर विजयीभंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर विजयी...
महायुतीने दाखविलेल्या समर्थनाचा हा विजय आहे - अविनाश ब्राह्मणकर
परभणी हिंगोली विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेचे सईद खान विजयीपरभणी हिंगोली विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेचे सईद खान विजयी
सईद खान 242
डॉ.विवेक नावंदर 159
सुशील देशमुख 56
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात भीषण अपघातपुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात भीषण अपघात
20 फूट दरीत कोसळले चार चाकी वाहन
सुदैवाने अपघातात कुठलीही जीवितहानी नाही
Ambernath Rain : वांगणी परिसरात रिमझिम पावसाची हजेरीवांगणी परिसरात रिमझिम पावसाची हजेरी
आकाशात ढग दाटल्याने सारे जण सुखावले
बळीराजाला पावसाच्या आगमनाची चाहूल
छत्रपती संभाजीनगर-जालना विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे सुहास शिरसाठ विजयीछत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार सुहास त्र्यंबकराव शिरसाठ यांनी विजय मिळवला.
या निवडणुकीत सुहास शिरसाठ यांना एकूण ४५५ प्रथम पसंतीची मते मिळाली
अमरावती विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे प्रवीण पोटे विजयीअमरावती विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे प्रवीण पोटे विजयी
प्रवीण पोटे यांनी विजयाचा कोटा पूर्ण करत मिळवले 390 मते
तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांना मिळाले 31 मते तर
काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख यांना मिळाली शून्य मते
काँग्रेसच्या उमेदवारांचा दारुण पराभव
Sangli : सांगली-सातारा विधान परिषद निवडणूक भाजपाचे धैर्यशील कदम विजयीसांगली-सातारा विधान परिषद निवडणूक
महायुतीतील भाजपाचे उमेदवार धैर्यशील कदम विजयी
घरी शील कदम यांना ८८५ पैकी पडली 593 पहिल्या क्रमांकाची मते
301 मतांनी धैर्यशील कदम यांचा झाला विजय
धाराशिव - बीड- लातुर विधानपरिषद निवडणुकीत भाजपाचे उमेदवार बसवराज पाटलांचा दणदणीत विजयधाराशिव बीड लातुर विधानपरिषद निवडणुकीत
भाजपाचे उमेदवार बसवराज पाटलांचा दणदणीत विजय
721 मतांनी काँग्रेसचे उमेदवार महेश देशमुख यांना चारली पराभवाची धूळ
राज्यात सर्वाधिक मताधिक्य घेऊन विजयी असण्याची शक्यता
845 मतांसह बसवराज पाटील विजयी
महाविकास आघाडीच्या मतालाही धक्का
जळगाव विधान परिषदेत निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन 577 मतांनी विजयीमहायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन 577 हून अधिक मतांनी विजयी
महाविकास आघाडीचे शरद तायडे यांना 5 मत
सोलापूरमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे राजेंद्र राऊत विजयीसोलापूरमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे राजेंद्र राऊत 365 मतांनी विजयी
विजयानंतर कार्यकर्त्यांनी केला जल्लोष
Nagpur : नागपूरमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे राजीव पोतदार विजयीनागपूरमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे राजीव पोतदार विजयी
विजयानंतर कार्यकर्त्यांनी केला जल्लोष
Nanded : नांदेडमध्ये विधानपरिषद निवडणुकीत भाजपाचे अमरनाथ राजूरकर यांचा विजयनांदेडमध्ये विधानपरिषद निवडणुकीत भाजपाचे अमरनाथ राजूरकर यांचा विजय.
अमरनाथ राजूरकर यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या गजरात केला जल्लोष.
अशोक चव्हाण राजकारणातील धुरंदर अशा आशयाचे बॅनर घेऊन कार्यकर्त्यांनी केला जल्लोष.
परभणीत शिवसेना महायुतीचे उमेदवार सईद खान यांचा विजयपरभणीत शिवसेना महायुतीचे उमेदवार सईद खान यांचा विजय
पहिल्या पसंतीचे २४२ मते मिळाल्याने विजय
दुसऱ्या नंबरवर महाविकास आघाडीचे उमेदवार विवेक नवंदर
आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात आंबेडकरी समाजाचा निर्धार; बीड ते मुंबई ‘लाँग मार्च’ लोणावळ्यात दाखल.अनुसूचित जाती-जमाती आरक्षणाचे उपवर्गीकरण होऊ नये, या प्रमुख मागणीसाठी बीड येथून निघालेला आंबेडकरी समाजाचा भव्य पायी ‘लाँग मार्च’ आता लोणावळा येथे पोहोचला आहे.
10 जून रोजी बीडमधून मुंबईच्या दिशेने कूच केलेल्या या मार्चमध्ये राज्यभरातील हजारो आंबेडकरी अनुयायी सहभागी झाले असून, मार्गक्रमणादरम्यान विविध ठिकाणी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात येत आहे.
Dharashiv : धाराशिवमध्ये भाजपच्या विजय रथाची सजावटधाराशिव मध्ये भाजपच्या विजय रथाची सजावट
मतमोजणीला सुरुवात, दुसरीकडे निकाला अगोदरच भाजपकडून जल्लोषाची तयारी
धाराशिव बीड लातूर विधान परिषदेत भाजप विरुद्ध काँग्रेस लढत
विजयाची खात्री आहे त्यामुळेच आम्ही तयारी करत आहोत भाजप कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया
कोंढापुरी तलाव कोरडा; शिरूर तालुक्यात पाणीटंचाईचे गंभीर संकटशिरूर तालुक्यातील कोंढापुरी तलाव कोरडा पडल्याने रांजणगाव गणपती, शिक्रापूर आणि परिसरातील गावांमध्ये तीव्र पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. तलावातील पाणीसाठा संपुष्टात आल्याने हजारो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
चाकण एसटी बसस्थानकाची दुर्दशा; कचरा आणि भाजीमंडईमुळे प्रवाशांचे हालऔद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेल्या चाकणमधील एसटी बसस्थानकाची दयनीय अवस्था समोर आली आहे.
बसस्थानक परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून दुसरीकडे भाजीमंडईचा बाजार भरत असल्याने एसटी बसना स्थानकात प्रवेश करण्यासही अडथळे निर्माण होत आहेत.
परिणामी प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नगरसेवक मजनू नाटेकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार?तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घडामोड समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग क्रमांक १०-अ मधील विद्यमान नगरसेवक मजनू नाटेकर यांचे अनुसूचित जाती (महार) प्रवर्गातील जातवैधता प्रमाणपत्र पुणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवून रद्द केले आहे.
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांच्या मधे थेट लढतजळगाव विधान परिषदेचा निकाल आज लागत आहे या मधे महायुतीचा उमेदवार विजयी होणार की महाविकास आघाडी चा उमेदवार विजयी होणार या कडे सगळ्यांच लक्ष लागले आहे.
जळगाव विधान परिषदेची निवडणूक महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन आणि महा विकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांच्या मधे चुरशीची होईल असे चिन्हे असताना, अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला होता तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाच्या रेशमा काळे यांनी बंडखोरी केल्याने ही निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय बनली होती.
Maharashtra News Live Update: - विधान परिषद निवडणुकीची आज मतमोजणी, निकालाकडे सर्वांचे लक्षछत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या निवडणुकीची आज मतमोजणी होणार आहे. सकाळी ८ वाजल्यापासून रेल्वे स्टेशन रोडवरील शासकीय औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयात ही मतमोजणी होत आहे. चार टेबलवर ही मतमोजणी होणार असून त्यासाठी ६५ अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकूण ६३७ मतदारांपैकी ६३० जणांनी मतदान केले. निवडणूक रिंगणात महायुतीचे सुहा शिरसाठ, महाविकास आघाडीचे गणे लोखंडे तर अपक्ष इसाक खान तीन उमेदवार असले तरी खरी लढत शिरसाठ आणि लोखंडे यांच्यातच होत असल्याचे दिसून येत आहे.