मालेगाव टपाल कार्यालयात २९ जूनला डाक अदालत मालेगाव : ग्राहकांच्या पोस्टाच्या कामकाजासंबंधी तक्रार निवारण्यासाठी मालेगाव येथील अधिक्षक डाकघर कार्यालयात २९ जूनला दुपारी तीनला डाक अदालत होणार आहे. ग्राहकांनी आपले तक्रार अर्ज अधीक्षक डाकघर, मालेगाव विभाग, मालेगाव यांच्या कार्यालयात टपाल, स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, डाक वस्तु, बचत बँक, मनीऑडर बाबतच्या तक्रारी २७ जूनपर्यंत पाठवाव्यात असे आवाहन श्री. ज्योतिक यांनी केले आहे.