संजय गडदे, साम टीव्ही
म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून, गोरेगाव येथील पंतप्रधान आवास योजनेतील केवळ 13 घरांसाठी तब्बल 17,755 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे या घरांच्या सोडतीत विजयी होणारे अर्जदार खऱ्या अर्थाने नशीबवान ठरणार असल्याची चर्चा आहे.
Pune: परवानगीशिवाय स्मार्ट मीटर लावाल तर गाठ माझ्याशी... पुणेकर वकिलाचा वीज कंपन्यांना 'पुणेरी' स्टाईलने कडक इशारागेल्या काही वर्षांत म्हाडाच्या घरांबाबत सर्वसामान्यांमध्ये आकर्षण वाढले आहे. यंदाच्या सोडतीत एकूण 2,640 सदनिकांसाठी 75,366 अर्ज प्राप्त झाले. त्यामध्ये गोरेगावमधील पंतप्रधान आवास योजनेतील घरांना सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. केवळ 13 घरांसाठी 17,755 अर्ज दाखल झाल्याने एका घरामागे सरासरी 1,365 अर्जदार स्पर्धेत आहेत. मुंबई मंडळाच्या या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी 145, अल्प उत्पन्न गटासाठी 858, मध्यम उत्पन्न गटासाठी 798 आणि उच्च उत्पन्न गटासाठी 839 सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्राप्त अर्जांची छाननी पूर्ण झाल्यानंतर स्वीकृत अर्जदारांची अंतिम यादी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Mumbai-Pune Expressway:मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर ३ वाहनांचा विचित्र अपघात, २ जणांचा जागीच मृत्यू; मिसिंग लिंकवर वाहतूक ठप्पगोरेगाव येथील अत्यल्प उत्पन्न गटासाठी असलेल्या घरांची किंमत सुमारे 32 लाख 36 हजार रुपये आहे. तुलनेने परवडणारी किंमत आणि मुंबईतील चांगले स्थान यामुळे या घरांसाठी अर्जदारांनी मोठी पसंती दर्शवली. यंदाच्या सोडतीत कन्नमवार नगर-विक्रोळी, जुने मागाठाणे-बोरिवली, सिद्धार्थ नगर-गोरेगाव, गांधीनगर-वांद्रे, पंतनगर-घाटकोपर, गोराई-बोरिवली, सुभाष नगर-चेंबूर, गिरगाव, वडाळा, कोपरी-पवई, माझगाव, तुंगा-पवई, लोकमान्य नगर-दादर, पहाडी गोरेगाव आणि अॅण्टॉप हिल-वडाळा या प्रकल्पांतील विविध उत्पन्न गटांसाठी घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
Maharashtra Politics: शरद पवार अन् काँग्रेसला मोठा धक्का; 15 बडे नेते शिंदेसेनेत प्रवेश करणार; राज्यात टायगर एक्स्प्रेस सुसाटदरम्यान, सोडतीतील सर्वात कमी किंमतीचे घर पीएमजीपी मानखुर्द येथे असून त्याची किंमत 29 लाख 37 हजार रुपये आहे. या चार घरांसाठी केवळ 48 अर्ज प्राप्त झाले आहेत. तर सर्वात महागडे घर ताडदेव येथील क्रिसेंट टॉवरमध्ये असून त्याची किंमत 6 कोटी 82 लाख रुपये आहे. या दोन घरांसाठी 21 अर्ज दाखल झाले आहेत. घरांच्या तुलनेत अर्जांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने यंदाची म्हाडा सोडत अत्यंत चुरशीची ठरणार असून, विशेषतः गोरेगावमधील 13 घरांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.