लखनऊ अग्निकांड : मृतांचा आकडा १५ झाला, इमारतीवरुन उडी मारणाऱ्या विद्यार्थ्यांचे काय झाले ?
Tv9 Marathi June 23, 2026 12:45 AM

उत्तर प्रदेशाची राजधानी लखनऊ येथे एका तीन मजली कमर्शिय इमारतीतील एनिमेशन सेंटरला लागलेल्या भीषण आगीत १४ जणांचा मृत्यू झाल्यानंतर या घटनेबद्दल पंतप्रधानासह, राष्ट्रपती आणि विरोधी पक्ष नेत्यांनी तीव्र दु:ख व्यक्त करीत मृतांच्या नातेवाईकांबद्दल सहवेदना व्यक्त केली आहे.या आगीचे लोळ आणि धुरातून वाचण्यासाठी खिडकीचे ग्रिल पकडून उडी मारणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्राण वाचले आहेत. किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीच्या ट्रॉमा सेंटरच्या डॉक्टरांनी खिडकीतून उडी मारणारा विद्यार्थी आणि अन्य जखमींच्या स्थितीबाबत ताजा मेडिकल अपडेट जारी केले आहे.

भीषण आगीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून ज्यात एक विद्यार्थी जीव वाचण्यासाठी खिडकीचे ग्रील पकडून उभा असल्याचे दिसत आहे. मात्र, आगीच्या ज्वालांमुळे हा विद्यार्थी थेट खाली कोसळताना दिसत आहे. या विद्यार्थ्यांच्या संदर्भात KGMU ट्रॉमा सेंटरचे सीएमएस डॉ. प्रेम राज सिंह यांनी सांगितले की जो मुलगा इमारतीवरुन उडी मारली त्याला कंबरेला मार लागला आहे. त्याचे माकड हाड आणि कंबरेच्या भागात जखम झाल्याने त्याच्यावर उपचार सुरु असून सध्या तो धोक्याच्या बाहेर आहे.

या विद्यार्थ्याची जखमांचे योग्य निदान करण्यासाठी त्याचे सीटी स्कॅन आणि एक्स-रे काढले जात आहे.त्यामुळे आत फ्रॅक्चर झाले आहे का याची तपासणी होणार आहे. ट्रॉमा सेंटरचे मेडिकल सुपरिटेंडेंट डॉ. अनिल अग्रवाल यांनी सांगितले की एकूण दोन मुलांनी वरुन उडी मारली होती. ज्यांच्या पाठीत आणि कंबरेत जखम झाली आहे. त्यांच्या तपासणीनंतर उपचार केले जाणार आहे.

१२ पुरुष आणि ३ महिलांचा समावेश

हॉस्पिटल प्रशासनाने या भीषण आगीत मृत्यू झालेल्यांचा अधिकृत आकडा अजून जाहीर केलेला नाही. डॉ. प्रेम राज सिंह आणि डॉ. अनिल अग्रवाल यांच्या मते रुग्णालयात आतापर्यंत एकूण २१ ते २२ लोकांना दाखल केले होते. त्यातील १५ लोक मृतावस्थेत होते. आगीत मृत्यू पावलेल्यात १२ तरुण ३ तरुणींचा समावेश आहे. या १५ लोकांच्या मृतदेहांचा पंचनामा करण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. त्यानंतर त्यांना पोस्टमार्टेमसाठी मार्च्युरीत नेले जाणार आहे. ढीगाऱ्यातून सुरक्षित काढलेले आणि रुग्णालयात दाखल केलेल्या ५ ते ६ मुलांची तब्येत आता स्थिर आहे. सध्या दोन मुलांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. उंचावरून उडी मारल्यामुळे पाठीला दुखापत झालेला एक मुलगा आणि पायाला दुखापत झालेली एक मुलगी. त्यांच्यासोबत आलेल्या इतर चार मुले पूर्णपणे ठीक असून, शुद्धीवर आहेत आणि आता बोलतही आहेत असे डॉ. प्रेम राज सिंह यांनी सांगितले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.