'..सर्वात वाईट सकाळ'; मराठी अभिनेत्यावर दु:खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचे निधन, भावुक होत म्हणाला..
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क June 23, 2026 03:43 PM

Marathi Tv Actor Sisters Death: टीव्ही मालिकेतून प्रकाशझोतात आलेला अभिनेता गुरु दिवेकर (Guru Divekar) सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. गुरुवर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. गुरु दिवेकरच्या बहिणीचे निधन झाले आहे. 18 जून रोजी अभिनेत्याच्या बहिणीने अखेरचा श्वास घेतला होता.  बहिणीच्या निधनानंतर गुरु खचला. त्यानं आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं आपल्या बहिणीचे फोटो पोस्ट करुन भावनिक कॅप्शन दिले आहे.  चाहते आणि नेटकऱ्यांनी गुरुच्या पोस्टवर कमेंट करुन श्रध्दांजली वाहिली आहे.  

गुरू दिवेकरच्या जवळच्या व्यक्तीचे निधन (Guru Divekar Emotional Post)

जुईली असे गुरु दिवेकरच्या बहिणीचे नाव आहे.  त्यानं आपल्या बहिणीचे काही खास फोटो सोशल मीडियात शेअर केले आहेत. अभिनेत्याने फोटो शेअर करत भावनिक कॅप्शन देखील दिलं आहे.  'माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट सकाळ. 18 जून 2026. त्यादिवशी मला एक फोन आला होती. तुझी जुईली ताई गेली.  माझी लाडकी ताई जुया आम्हाला सोडून गेली, अशी माहिती मिळाली. याची माहिती मिळताच मी तातडीने रुग्णालयात धाव घेतली'.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Guru Divekar (@gurudivekar7_official)

'नातेवाईकांना भेटल्यानंतर मला बहिणीला पाहण्याची हिंमत झाली नाही.  सर्व आठवणी माझ्या मनात दाटून आल्या.  यावेळी नातवाईक तिच्यासोबतच्या आठवणी सांगत होत्या. उपस्थित सर्वजण रडत होते.  एक भाऊ,  एक पुरुष, एक जबाबदार नागरिक असण्याची जबाबदारी, हे सर्व त्यावेळी पेलण्यापलीकडे होते', अशी भावना अभिनेत्याने व्यक्त केली. 'काही जण म्हणाले की, माझी ताई कमजोर होती. पण मी ती गोष्ट ठामपणे नाकारतो.  ती शक्य तितका काळ लढली'.

'या पोस्टद्वारे मी माझ्या बहिणीला श्रद्धांजली वाहतो.  आज तुमची प्रिय व्यक्ती  असते, दुसऱ्या दिवशी त्याच प्रिय व्यक्तीची राख  होऊ शकते.  ऐकायला किती कठोर वाटत असले तरी, ही गोष्ट खरी आहे. त्यामुळे आपल्या परिवाराची काळजी घ्या. मित्रपरिवार आणि कुटुंबाची काळजी  घ्या.  निसर्गासमोर कुणाचेच काही चालत नाही. कुणीच श्रेष्ठ नाही. आपण केवळ जीवन जगू शकतो आणि दुसऱ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करु शकतो. जुईली ताई नेहमी याच गोष्टीवर विश्वास ठेवायची.  जुईली ताई आमच्या कुटुंबाच्या जवळची होती.  आता ती आमच्या हृदयात खोलवर गेली आहे', असं अभिनेत्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

अनुश्री मानेकडून चाहत्यांना गुडन्यूज; अवघ्या 25 व्या वर्षी स्वप्न पूर्ण केलं, बाबांच्या आठवणीत भावुक होत म्हणाली...

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.