शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत बंडखोर खासदार आणि विशेषतः खासदार संजय पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
काल शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर संजय पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपल्या नाराजीची कारणे मांडली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, “जर तुमचं भांडण पक्षातील काही व्यक्तींशी होतं, तर त्यासाठी मातोश्रीवर येऊन चर्चा करायला हवी होती. पक्ष सोडण्याचं कारण म्हणून या गोष्टी पुढे करणं योग्य नाही.” यावेळी राऊत यांनी गंभीर आरोप करत काही आर्थिक व्यवहारांबाबतही प्रश्न उपस्थित केले. “काही व्यवहारांची माहिती आमच्याकडे आहे. पक्षात याबाबत चर्चा झाली असून योग्य वेळी सर्व गोष्टी समोर आणल्या जातील,” असा दावा त्यांनी केला.
तसेच स्थानिक निवडणुकांमधील उमेदवारी वाटपावरून करण्यात आलेल्या आरोपांनाही राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. “उमेदवारी दिल्यानंतरही खोटे आरोप केले जात आहेत. पक्ष सोडल्यानंतर काही जणांकडून दिशाभूल करणारी वक्तव्ये केली जात आहेत,” असे ते म्हणाले.
दरम्यान, संजय पाटील यांनी केलेल्या काही वक्तव्यांवरून दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे दिसून आले. संजय पाटील यांनी बंदुकीची Action केली, माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबाकडे वाईट नजरेने बघितलं तर हॉस्पिटलमध्ये जालं असं ते म्हणाले. त्यावर संजय राऊत यांनी त्यांना थेट चॅलेंज दिलं. “मी लागतो नादाल चल, तुझ्या नादाला लागतो मी. बंदुक दाखवू नको, नाव घेऊन बोलतो XXXX. शिवसैनिकांना बंदुक दाखवू नकोस. मी इथेच आहे. बंदूक दाखवतोस साल्या. मी भांडूपलाच आहे, शिवसैनिकांना बंदुक दाखवतो गद्दार माणूस. 50 कोटी गिळलेना मग गप्प बसं. परत बंदुकीची भाषा करायची नाही. बंदुक तुझ्या ढुंगणात घालीन. झेड प्लस सुरक्षा काढून ये. कायदा-सुव्यवस्था आहे की नाही मिस्टर फडणवीस. सोड रे एकनाथ शिंदे चलं” अशा भाषेत संजय राऊत बोलले.
शिवसेनेतील या नव्या संघर्षामुळे ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील राजकीय वाद अधिक चिघळण्याची चिन्हे दिसत असून, आगामी काळात या आरोप-प्रत्यारोपांना आणखी वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.