विकासकामांसाठी निधी मिळत नाही, म्हणून ठाकरे गटाच्या खासदारांनी पक्ष सोडून सत्ताधारी पक्षात प्रवेश केला अशी चर्चा आहे. त्यावर संजय राऊत यांनी स्वत:च आकडे सांगून हे आरोप खोडून काढले. म्हणजे विरोधी पक्षाच्या खासदारांची सरकारकडून विकास निधीसाठी कुठलीही अडवणूक होत नाही हे स्पष्ट झालं. “काल महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांच्या पक्षाचा नाशिक विधान परिषदत निवडणुकीत पराभव झाला. भाजपची सर्व मत गोकुळ गीतेना पडली. पण पुढल्या दोन तासात गोकुळ गीतेना विकत घेऊन त्यांना आपल्या पक्षात आणलं. हे राजकारण सध्या महाराष्ट्रात चाललय. पैसा फेको तमाशा देखो” असं संजय राऊत म्हणाले. “झाकलेले पुतळे जसे उघडतात, तसे काल झाकलेले गद्दारांचे पुतळे मिंधेंनी उघडून दाखवले. काय म्हणाले, आम्ही त्यांचा मान-सन्मान ठेऊ. मग,आमच्या पक्षात मान-सन्मान नव्हता का, आमच्या पक्षात अधिक मानसन्मान, स्वाभिमान होता” असं संजय राऊत म्हणाले.
“यांचा मानसन्मान ठेवणार म्हणजे ५० कोटी ७५ कोटी प्रत्येकाला मिळालेले आहेत. आता हे मानसन्मान निधीसाठी गेले. आकडे आलेत, जो निधी आहे तो ही धड हे वापरु शकले नाहीत. १५-१६ कोटीचा निधी पडून आहे. मग जे आकडे समोर आलेले आहेत, तो निधी का वापरला गेला नाही. कोणी तुम्हाला अडवलेलं विकासासाठी. निधी वापरला नाही. आता तुम्ही कोणात्या निधीसाठी गेलात. एका खासदारांचा १६ कोटी निधी शिल्लक आहे. एकाने शिर्डीत फक्त पाच २५ लाख खर्च केलेत. या नवीन गटात गेल्यामुळे त्यांना निधी म्हणजे ठेकेदारी मिळणार. २०० कोटीची कामं मिळणार, त्यातले २५ टक्के थेट घरात जाणार. यासाठी हा त्यांचा मानसन्मान. ठेकेदारीत कमिशन मिळणार. जनता खुळी नाही” असं राऊत म्हणाले. “मिंधे गटातला पोपट म्हणाला हे पाळणाघर आहे का, शिवसेनाप्रमुखांच्या वक्तव्याची खिल्ली उडवण्याचं काम मिंधे गटाने केलं. बाळासाहेब ठाकरेंनी वृद्धाश्रम आणि पाळणाघरं काढली. याच पाळणाघरातून तुम्ही पुढे गेलात. नाहीतर कोणी विचारला असतं, कुपोषणाने मेला असता” अशी टीका संजय राऊतयांनी केली.
तुम्ही ठेकेदारांची पाळणाघरं केली
“पहिल्यांदा युती सरकार आल्यानंतर मातोश्री वृद्धाश्रम योजना काढली. पाळणाघर, वृद्धाश्रम ही मनावतेची काम आहेत. तुम्ही ठेकेदारांची पाळणाघरं केली” असा आरोप संजय राऊत यांनी केला. मतदारसंघातील जनता यांना माफ करणार नाही. उद्धव ठाकरे 27 तारखेपासून या मतदारसंघांच्या दौऱ्यावर आहेत. अशी माहिती राऊत यांनी दिली.