ईश्वरपूर (सांगली) : प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाविरोधात वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांनी तीव्र भूमिका घेतली (Maharashtra Shaktipeeth Highway controversy) आहे. आज हरकती दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी १२७६ शेतकऱ्यांनी वाळवा तालुक्याचे भूसंपादन अधिकारी तथा प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्याकडे आपल्या हरकती सादर केल्या.
कामेरी, ऐतवडे खुर्द, कुरळप, जुनेखेड, नवेखेड, मसुचीवाडी, येलूर, येडेनिपाणी आदी गावांतील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महामार्गासाठी प्रस्तावित भूसंपादन प्रक्रियेविरोधात आपली भूमिका नोंदवली. या महामार्गामुळे सुपीक शेती, शेतकऱ्यांचे उपजीविकेचे साधन आणि ग्रामीण भागातील सामाजिक-आर्थिक संरचनेवर विपरीत परिणाम होणार असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
Tukaram Mundhe Crackdown : मुंढेंच्या दणक्याने हॉटेल्सही 'सरळ'! आधी सिलिंडर, आता 'एफडीए'मुळे मेन्यूमध्ये कपात; पनीर, चीज, खवा 'गायब'चवाळवा तालुका ‘शक्तिपीठ’विरोधी संघर्ष समितीच्या वतीने सांगण्यात आले की, हरकती दाखल करण्याची मुदत अद्याप शिल्लक असून पुढील काही दिवसांत हजारो शेतकरी आपल्या हरकती दाखल करणार आहेत. त्यामुळे या महामार्गाविरोधातील जनआक्रोश अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
यावेळी वाळवा तालुका ‘शक्तिपीठ’विरोधी संघर्ष समितीचे अनिल पाटील, सरपंच रणजित पाटील, सचिन जाधव, गुंडानाना पाटील, ॲड. विजय पाटील, रोहित कदम, विजय पाटील, संजय पाटील, संतोष माळी, रणजित पाटील, इंद्रजित पाटील, सुधीर पाटील, प्रकाश कदम यांच्यासह विविध गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.