गुजरातमध्ये आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. नर्मदा जिल्ह्यातील राजपिप्ला येथील सेशन्स कोर्टाने 'आप'चे आमदार चैतर वसावा आणि त्यांच्या पत्नीसह एकूण 9 जणांना वन अधिकाऱ्यांवर हल्ला आणि खंडणी वसूल केल्याप्रकरणी दोषी ठरवत 7 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. या शिक्षेमुळे आता चैतर वसावा यांची आमदारकी धोक्यात आली आहे. हे प्रकरण ऑक्टोबर 2023 मधील आहे. आमदार वसावा यांनी शस्त्रातून हवेत गोळीबार (फायरिंग) केल्याचाही आरोप होता. यानंतर वन अधिकाऱ्यांकडून 60 हजार रुपयांची खंडणी उकळण्यात आली होती.
Mumbai Rain : मुंबईत पावसाचा जोर वाढला; रस्त्यालगतची धोकादायक झाडे कोसळली, वाहतूक कोंडीमुंबईत मुसळधार पावसाने जोर पकडल्याचे दिसत आहे. वसई विरार शहरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रस्त्यालगतची धोकादायक झाडे कोसळली आहेत. आगाशी, राजोड़ी, उमराला, दिवानमान या ठिकाणच्या रस्त्यावर झाडे पडल्यामुळे त्याठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. वसई विरार महापालिकेने ही धोकादायक झाडे तशीच ठेवल्यामुळे ती झाडे कोलमडून पडू लागली आहेत.
Mumbai Rain Update : मुंबई अन् पालघरला पावसाचा 'रेड अलर्ट'; नागरिकांना खबरदारीचे आवाहनमान्सून मंगळवारी मुंबईत दाखल होताच पावसाने जोरदार बरसण्यास सुरुवात केली आहे. नेहमीच्या वेळेपेक्षा 12 ते 13 दिवस उशिराने आलेल्या या पावसामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला. मान्सून दाखल होताच हवामान विभागाने मुंबई आणि पालघर जिल्ह्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील 3 तासांत मुंबई आणि पालघर जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
विष्णू चाटेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळलामस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. विष्णू चाटे चा मुक्काम जिल्हा कारागृहात वाढ
Maharashtra Rain Update: पावसामुळे चाकरमान्यांचे हाल, रस्त्यावर वाहनांचा लांबच लांब रांगापावसामुळे चाकरमान्यांचे हाल झाले आहे. वाहतूक कोंडीमुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. आरे कॉलनी परिसरात एक ते दीड किलोमीटर रस्त्यावर वाहनांचा लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे
Mumbai Local : ठाणे ते पनवेल लोकल सेवा सुरूपावसामुळे अनेक ठिकाणी लोकल सेवा ठप्प झाली आहे. ठाणे ते पनवेल लोकल सेवा तब्बल १ तासाने सुरु झाली आहे. पहिली गाडी ठाण्याला रवाना झाली आहे.
Maharashtra Rain Update : पुढील काही तास पावसाचा जोर असेल,
राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काल रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. पुढील काही तास पावसाचा जोर असेल, असे हवामान विभागाने सांगितले आहे. आज सकाळ पासून सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईतील रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे.