Pune Crime News पुणे : खराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात घरातील छोटा गॅस सिलेंडर मारल्याने (Pune Crime News) तिचा जागीच मृत्यू झाला. किरण जयराम बाबर (वय अंदाजे 30 ते 32) असे मृत (Crime News) महिलेचे नाव असून आरोपी पती जयराम तोताराम बाबर हा घटनेनंतर फरार झाला आहे.
Pune Crime News: दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद, संतापाच्या भरात घरातील छोटा गॅस सिलेंडरने प्रहार
खराडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नी मूळचे मध्य प्रदेशातील रहिवासी असून खराडी परिसरातील एका लेबर कॅम्पमध्ये राहत होते. उदरनिर्वाहासाठी ते कचरा संकलनाच्या वाहनावर काम करत होते. मंगळवारी मध्यरात्री दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर संतापाच्या भरात जयराम बाबर याने घरातील छोटा गॅस सिलेंडर उचलून पत्नी किरण हिच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आणि तिचा जागीच मृत्यू झाला.
Pune Police: फरार आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना
घटनेची माहिती मिळताच खराडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. फरार आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. मात्र या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
Pune : पुणे गोळीबार प्रकरणी नवी माहिती, गोळीबार करण्यासाठी वापरण्यात आलेली दुचाकी जप्त
पुणे गोळीबार प्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. गोळीबार करण्यासाठी वापरण्यात आलेली दुचाकी पुणे पोलिसांनी जप्त केली आहे. मात्र, गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींचा शोध अद्याप सुरूच आहे. पुणे पोलिसांची अनेक पथकं आरोपींच्या शोधासाठी रवाना कारण्यात आले आहे. रविवारी रात्री पुण्यातल्या फुरसुंगीमध्ये एका स्टील फॅक्टरीवर दोन आरोपींकडून गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबाराची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारली होती. दरम्यान, गुन्हे शाखेकडून घटनेचा अधिक तपास सुरू आहे.