Wildlife Conservation: मेळघाट ते रणथंबोर : गिधाडाची 'गरुड'भरारी, गिधाडाचा राजस्थानपर्यंत ३,३३४ किलोमीटरचा प्रवास, असा केला प्रवास..
esakal June 25, 2026 11:45 AM

मुंबई : महाराष्ट्रातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जानेवारी महिन्यात मुक्त केलेल्या एका गिधाडाने सुमारे ३,३३४ किलोमीटरचा प्रवास केला आहे. विविध राज्यांच्या सीमा ओलांडून हे गिधाड राजस्थानमधील रणथंबोर व्याघ्र प्रकल्पात पोहोचले असल्याची माहिती वन्यजीव तज्ज्ञांनी बुधवारी दिली.

Deool Band 2: ‘देऊळ बंद-२’ ची कमाई आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी; प्रवीण तरडे-कैलास वाणी, साईबाबांच्या शिर्डीत संकल्प जाहीर

बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीचे (बीएनएचएस) संचालक किशोर रिठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या गिधाडाने नैसर्गिक अधिवासात कोणत्याही अतिरिक्त अन्नाशिवाय स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवले आहे. पिंजऱ्यात वाढलेली गिधाडे नैसर्गिक वातावरणाशी जुळवून घेऊ शकतात, स्वतःचे अन्न शोधू शकतात आणि लांब पल्ल्याचा प्रवास करू शकतात, हे यावरून सिद्ध झाले आहे. गिधाड संवर्धन कार्यक्रमातील हा एक महत्त्वाचा टप्पा असून, यामुळे भारतातील गिधाडांची संख्या वाढवण्याच्या मोहिमेला बळ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रवासादरम्यान या गिधाडाने मध्य प्रदेशातील पाचमढीजवळील सातपुडा व्याघ्र प्रकल्प आणि कुनो राष्ट्रीय उद्यानालाही भेट दिली. त्यानंतर मंगळवारी ते रणथंबोर व्याघ्र प्रकल्पात पोहोचले. ‘X67’ नावाचे हे पाच वर्षांचे मादी गिधाड असून, दोन जानेवारी रोजी मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अकोट वन्यजीव विभागाच्या सोमठाणा वनपरिक्षेत्रातून १५ गिधाडांना मुक्त करण्यात आले होते. या सर्व गिधाडांना सौर ऊर्जेवर चालणारे ट्रॅकिंग टॅग लावण्यात आले होते.

असा केला प्रवास

मुक्त केल्यानंतर सुमारे चार महिने हे गिधाड मेळघाट परिसरातच वावरत होते. त्याने २८ मे रोजी मेळघाटातून आपला प्रवास सुरू केला. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान असा प्रवास करत २७ दिवसांत ३,३३४ किलोमीटर अंतर कापून ते रणथंबोरमध्ये पोहोचले. या प्रवासात त्याने सातपुडा राष्ट्रीय उद्यान, भोपाळ परिसर आणि कुनो राष्ट्रीय उद्यान येथे मुक्काम केला.

Success Story: जुन्नरच्या सिद्धीने गाठले आकाश! अवघ्या २०व्या वर्षी अमेरिकेतून कमर्शियल पायलट बनण्याचा मान, सिद्धी हाडवळेची प्रेरणादायी यशोगाथा.. निळ्या कड्या व ओळख क्रमांक

मेळघाटातून सोडण्यात आलेल्या सर्व १५ गिधाडांच्या पायात निळ्या रंगाच्या कड्या आणि ओळख क्रमांक लावण्यात आले आहेत. हे गिधाड भारतातील असल्याचे निळा रंग दर्शवतो, तर ‘एम’ हे अक्षर महाराष्ट्र राज्याचे प्रतीक आहे. या टॅगच्या मदतीने शास्त्रज्ञांना गिधाडांच्या हालचाली, प्रवासाचे अंतर आणि त्यांच्या सुरक्षिततेवर लक्ष ठेवणे सोपे जात आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.