Kolhapur police transfers : कोल्हापूर जिल्ह्यातील पोलिस विभागात मोठ्या प्रमाणावर बदल्या करण्यात आल्या असून अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदलीचे आदेश मंगळवारी जारी करण्यात आले. या बदल्यांमध्ये करवीर, शाहूवाडी आणि गडहिंग्लज उपविभागीय अधिकारी पदांचा समावेश आहे.
करवीरचे पोलिस उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर यांची आहिल्यानगर येथे बदली झाल्याने त्यांच्या जागी शाहूवाडीचे उपअधीक्षक आप्पासाहेब पवार यांची करवीरच्या उपअधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर मिरजचे उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांची शाहूवाडी येथे बदली झाली आहे.
गोंदिया येथून आलेले विवेक पाटील यांची गडहिंग्लज उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पोलिस निरीक्षक बाळकृष्ण गाडे यांची रत्नागिरीहून जात पडताळणी विभागाच्या पोलिस उपअधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे.
याशिवाय शहरातील पोलिस प्रशासनातही काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. सतीश गुरव यांची विशेष पोलिस महानिरीक्षकांचे वाचक म्हणून नियुक्ती झाली असून आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.
Kolhapur Police Transfers : कोल्हापूर जिल्ह्यातील दहा पोलिस निरीक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या, एसपींनी काढले आदेशदरम्यान, पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांची नागपूर येथे पोलिस उपअधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. तर प्रवीण खानापुरे यांची छत्रपती संभाजीनगर येथे राज्य गुप्तवार्ता विभागात अप्पर पोलिस उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे. या बदल्यांमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील पोलिस प्रशासनात नव्या जबाबदाऱ्यांचे फेरबदल झाले असून काही महत्त्वाच्या पदांवर नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे.