Ketan Agrawal case : पुण्याच्या केतन अग्रवाल प्रकरणणानं संपूर्ण देश हादरला आहे. सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी रचलेल्या कटाचा पर्दाफाश झाल्यानंतर केतन अग्रवाल लोहगडावरुन पाय घसरुन पडला नव्हता, तर त्याला धक्का दिला होता, हे स्पष्ट झालंय. सगळीकडे सिया आणि चेतन यांनी उचललेल्या पावलावर संताप व्यक्त करत आहेत. दरम्यान, या प्रकरणावर पहिल्यांदाच सिया गोयलच्या आई वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे. केतन एक अत्यंत सुसंस्कृत व्यक्ती होता. तो मुलांपेक्षाही जास्त आमचा आदर करत होता. आमच्या कुटुंबाला केतन खूप प्रेम दिल्याची प्रतिक्रिया सिया गोयलच्या आईने दिली आहे. या घृणास्पद गुन्ह्यासाठी जो कोणी दोषी असेल त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
केतन अग्रवालच्या मृत्यू प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे असी प्रतिक्रिया सिया गोयलच्या आईने दिली आहे. तो मुलांपेक्षाही जास्त आमचा आदर करत होता. केतनने आमच्या कुटुंबाला खूप प्रेम दिल्याची प्रतिक्रिया सियाची आईने दिली. केतन आणि सीयाच्या लग्नाची उदयपूरमध्ये भव्य तयारी सुरु होती. कोट्यावधी रुपये खर्च करुन आलिशान विला बुक करण्यात आले होते. पाहुण्यांच्या याद्या तयार झाल्या होत्या. लग्नासाठी पाहुण्यांना ने आण करण्यासाठी दोन चार्टर विमाने बुक करण्यात आल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत सिया गोयलच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही फेक न्यूज असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
अग्रवाल कुटुंबात लग्नाची तयारी सुरू असताना, प्रेमातील अडसर दूर करण्यासाठी केतनची भावी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांनी मिळून केतन अग्रवालची लोहगड किल्ल्यावरून दरीत ढकलून हत्या केल्याचं तपासाअंती स्पष्ट झालं. सध्या सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोन्ही आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यादरम्यान पोलिसांच्या चौकशीत लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?, याची माहिती समोर आली आहे.
बालीचा बेत फसल्यानंतर, 14 जून रोजी सुद्धा सियाने केतनला लोहगड किल्ल्यावर नेले होते. मात्र, त्या दिवशी परिस्थिती अनुकूल न मिळाल्यामुळे किंवा धाडस न झाल्यामुळे त्यांचा कट पूर्ण होऊ शकला नाही. 19 जून रोजी दोघांच्या कुटुंबीयांनी मिळून सियाचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले होते. मात्र सियाने केतनकडे 18 जून रोजीच लोहगडला ट्रेकिंगसाठी जाण्याचा आग्रह धरला. ठरलेल्या कटानुसार, तिचा प्रियकर चेतन चौधरी हा आधीच लोहगड किल्ल्यावर पोहोचला होता. केतन पुढे असताना चेतन पाठीमागून आला आणि त्या दोघांनी मिळून केतनला खोल दरीत ढकलून दिले, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.
- 18 जून केतन अगरवाल पाय घसरुन दरीत पडल्याचा बनाव
- दरीतून मृतदेह बाहे काढणाऱ्या शिवदुर्ग रेस्क्यू टीमकडे 'अशी' घटना घडेल का? पोलिसांची विचारणा आणि पहिला संशय
- सर्व विधी पार पडल्यावर 21 जूनला कुटुंबीय लोहगडावर पोहचले. केतनचा पडून मृत्यू झाला नसल्याचा पोलिसांकडे दावा
- मग सिया सांत्वनासाठी केतनच्या घरी आली, तेंव्हा केतनची बहीण संजनाने सियावर प्रश्नांची सरबत्ती केली.
- लोहगडावर तुम्ही काय-काय केलं? कुठं-कुठं फोटो काढले? फोटो काढताना पाय नेमका कसा घसरला? तेंव्हा तू खरंच फोटो काढत होतीस का? असे एकणानेक प्रश्न विचारताचं ती अनुत्तरित झाली
- बहीण संजनाच्या प्रश्नांनी सियावर संशय वाढला.
- वडील आणि बहिणींनी उपस्थिती केलेली शंका, दिलेले जबाब यातून तपासाची चक्र वेगाने हलली.
- जबाबात चेतन चौधरीचं नाव आलं. सिया आणि चेतनचे सिडीआर तपासण्यात आले.
- सिया आणि चेतनमध्ये गेल्या वर्षभरात 2004 वेळा फोन कॉल झाल्याचं आणि तीनशेहुन अधिक तास संवाद झाल्याचं उघड
- पण 18 जूनला तेजसचं लोकेशन लोहगडावर आढळलं नाही.
- एक तरुण भर उन्हात हुडी, हेडफोन आणि मास्क घालून लोहगडाच्या सीसीटीव्हीत आढळला.
- तोचं तरुण पुढं जाऊन सियाला काहीतरी खुनवत असल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं.
- हा तरुण चेतन असेल तर मग फोन लोकेशन मार्केटयार्ड का दाखवतोय? मग पोलिसांची 18 जूनला चेतनच्या फोनवर आलेल्या व्यक्तींकडे विचारणा.
- चेतनचा फोन दुकानातील कामगारने उचलल्याचे आणि कामगाराचा फोन घेऊन चेतन लोहगडावर आल्याचं स्पष्ट
- 22 जूनच्या रात्री पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने तेजसला ताब्यात घेतलं.
- तेजसला पोलिसी खाक्या दाखवताच सियाचं ही बिंग फुटलं.