पासपोर्ट अर्जाच्या शुल्कात मोठी वाढ, तात्काळ पासपोर्टसाठी 5000 रुपये मोजावे लागणार, नवे दर जाणून घ्या
जगदीश ढोले June 25, 2026 11:43 PM

पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्र, सरेंडर प्रमाणपत्र किंवा ग्लोबल एंट्री प्रोग्रॅम सारख्या सेवांचं शुल्क आता 500 रुपयांनी वाढून 750 रुपये झालं आहे.  

कोणाला सूट मिळणार?

सरकारनं पासपोर्टच्या शुल्कात वाढ करताना काही नागरिकांना दिलासा देखील दिला आहे. 8 वर्षांपर्यंतची मुलं आणि 60 वर्षांवरील नागरिकांना पासपोर्ट शुल्कात 10 टक्के सवलत मिळेल. ही सूट नव्या पासपोर्टवर असेल, पासपोर्ट दुसऱ्यांदा बनवताना उपलब्ध नसेल. पासपोर्ट शुल्क वाढलं असलं तरी त्याची वैधता पहिल्या प्रमाणं कायम असेल. मुलांचा पासपोर्ट 5 वर्ष किंवा 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत आणि  प्रौढ व्यक्तींचा पासपोर्ट 10 वर्ष वैध असेल.  

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.