आठवड्यातून फक्त एकदा घरात शिंपडा हा द्रव पदार्थ; साप पुन्हा कधीच घरात येणार नाही, सर्पमित्रही हीच ट्रीक वापरतात
Tv9 Marathi June 26, 2026 12:45 AM

राज्यात मान्सूनने दमदार पुनरागमन केलं आहे. पावसाला जोरदार सरुवात झाली आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बिळात पाणी शिरल्यामुळे साप बिळातून बाहेर पडतात. त्यामुळे या काळात सर्पदंशाचा धोका अधिक वाढतो. तसेच पावसाळ्याच्या दिवसांमध्ये गवत देखील मोठ्या प्रमाणात वाढतं, त्यामुळे अनेकदा या गवतामध्ये देखील साप लपून बसतात आणि ते आपल्याला दिसत नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर पाय पडला तर ते आपल्याला दंश करण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे पावसाळ्यात सापांपासून बचाव करणं गरजेचं असतं. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शेतीच्या कामांना देखील वेग येतो. शेतात देखील अनेकदा सर्पदंशाच्या घटना घडतात. साप चावल्यानंतर एखाद्या व्यक्तीला वेळेत उपचार मिळाले तर त्याचा जीव वाचू शकतो. परंतु जर वेळेत उपचार मिळाले नाहीत तर व्यक्ती दगावण्याची देखील शक्यता असते.

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साप कोरड्या जागेच्या शोधात असतात. त्यामुळे तुमचं घर जर ग्राऊंड लेव्हलला असेल तर अशावेळी ते तुमच्या घरात देखील घुसू शकतात. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं असतं की पावसाळ्याच्या काळात तुमच्या घराचा परिसर स्वच्छ ठेवणं. जर तुमच्या घराचा परिसर स्वच्छ असेल तर हा धोका टाळता येऊ शकतो.  सापांपासून बचाव कसा करायचा यासाठी काही उपाय आहेत, जसं की आपलं घर आणि परिसर स्वच्छ ठेवणं, बागेची काळजी घेणं, बागेमध्ये गवत जास्त वाढू न देणं, त्याची वेळच्या वेठी छाटणी करणं असे अनेक उपाय आहेत.

सापांना तीव्र वासाचा त्रास होतो. जर एखाद्या घरातून तीव्र वास येत असेल तर साप सहसाहा अशा घराकडे फटकत देखील नाहीत. जसं की पेट्रोल, डिझेलचा वास, सापाला पेट्रोलियम पदार्थांचा वास सहन होत नाही, त्यामुळे अशा ठिकाणापासून तो दूर राहतो, तसेच घरात जे मसाल्यांचे पदार्थ असतात, जसं की लसून, कांदा यांच्या पाकळ्यांचा वास देखील सापाला सहन होत नाही. बाजारामध्ये लसून तेल नावाचा एक द्रव पदार्थ मिळतो. या द्रव पदार्थाचे अनेक आयुर्वेदिक उपयोग आहेत. परंतु तुम्ही याचा वापर साप घरात येऊ नये, यासाठी देखील करू शकता. या द्रव पदार्थाला प्रचंड उग्रवास असतो, तसेच तो जर हाताला किंवा शरीराच्या कोणत्याही भागाला लागला तर त्यामुळे थोडावेळ तुम्हाला जळजळ देखील होऊ शकते. हा पदार्थ पाण्यात मिसळून जर तुम्ही दर आठवड्याला जिथून तुमच्या घरात साप येण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी शिंपडला तर साप घरात येण्याचा धोका कमी होतो.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.