Ketan Agarwal Murder Case Key Developments So Far : पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणात दररोज नवी माहिती समोर येत आहे. अशातच मुख्य आरोपी सिया गोयल हिच्या वडिलांनी मागणी केली आहे की, जर त्यांची मुलगा दोषी आढळली, तर तिलाही त्याच किल्ल्यावरून खाली ढकलून दिले जावे. आरोपी सियाचे वडील प्रवीण गोयल म्हणाले की, माझी मुलगी असे कृत्य करू शकते यावर त्यांचा विश्वासच बसत नाही. दरम्यान, तिच्या आईने सांगितले की, केतन आणि सिया यांच्यात कधीही तणाव दिसून आला नाही आणि ते सतत एकमेकांच्या संपर्कात होते.
प्रवीण गोयल एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, "माझी मुलगी असे काहीतरी करू शकते, हे मला अजूनही अशक्य वाटते.ती माझ्याशी कधीही खोटे बोलली नाही आणि ती नेहमी सत्याच्या मार्गावर चालली." ते पुढे म्हणाले, "जर माझी मुलगी दोषी आढळली, तर न्यायालयाने न्याय देण्यात विलंब करू नये. तिला योग्य ती शिक्षा मिळाली पाहिजे. एक वडील म्हणून मी यापेक्षा जास्त काहीही बोलू शकत नाही."
'तिला त्याच किल्ल्यावरून खाली ढकला'ते म्हणाले, "जर ती दोषी आढळली, तर तिला त्याच किल्ल्यावर नेले जावे आणि अगदी त्याच ठिकाणाहून खाली ढकलले जावे. एक वडील म्हणून मी एवढेच सांगू शकतो."तसेच तिलाही फाशीची शिक्षा झाली पाहिजे." असंही ते म्हणाले.
Ketan Agarwal Case : चेतनच्या कृत्यामुळे कुटुंब धास्तावले; फ्लॅटला कुलूप लावून रातोरात झाले पसार! आईने काय सांगितले?वृत्तवाहिनीशी बोलताना सियाच्या आईने सांगितले, "ते एकमेकांशी व्हिडिओ कॉलवर बोलायचे. ते नियमितपणे भेटायचे आणि एकत्र आनंदी होते. केतन जेवणासाठी आमच्या घरीही आला होता. काहीतरी अयोग्य घडत असल्याचे कोणतेही संकेत आम्हाला कधीच दिसले नाहीत." विशेष म्हणजे, सियाला केतनशी लग्न करायचे नव्हते, हा दावाही त्यांनी फेटाळून लावला.
त्या म्हणाल्या, "जर तिने आम्हाला सांगितले असते की तिला केतनशी लग्न करायचे नाही, तर आम्ही लग्नाच्या खरेदीवर इतका खर्च का केला असता?" त्यांनी नमूद केले की, बाली येथील लग्नापूर्वीच्या सहलीसाठीच्या खरेदीवर त्यांनी ५०,००० रुपये खर्च केले होते. त्या पुढे म्हणाल्या, "केतन माझ्या मुलासारखा होता आणि या घटनेने दोन्ही कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. आम्ही मोठ्या उत्साहाने लग्नाची तयारी करत होतो."
सियाने इशारा दिला, चेतनने त्याला ढकललेबोलताना एका पोलीस अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेशी बोलताना खुलासा केला की, १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावर सियाने तिचा प्रियकर चेतन चौधरी याला पूर्वनियोजित इशारा दिला आणि त्यानंतर चेतनने केतनला दरीत ढकलून दिले. अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया आणि चेतन यांनी पळून जाण्याऐवजी केतनची हत्या करण्याचा निर्णय घेतला; कारण पळून गेल्याने आपल्या कुटुंबाची बदनामी होईल अशी भीती त्यांना वाटत होती.
अधिकाऱ्याने सांगितले की, "सुरुवातीला सिया आणि चेतन यांनी एकमेकांवर दोष ढकलण्याचा प्रयत्न केला; चौकशीदरम्यान गुन्हेगारांकडून अशी वर्तणूक होणे स्वाभाविक असते. मात्र, अखेरीस सियाने कबूल केले की हा कट तिनेच रचला होता आणि त्यात चेतनचाही सहभाग होता."