पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) ‘महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६’ची तब्बल दोन हजार ६१९ पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. या पद भरतीसाठी २७ जून ते १७ जुलै या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
Deool Band 2: ‘देऊळ बंद-२’ ची कमाई आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी; प्रवीण तरडे-कैलास वाणी, साईबाबांच्या शिर्डीत संकल्प जाहीरराज्य सरकारच्या विविध विभागांतर्गत एकूण दोन हजार ६१९ पदांच्या भरतीसाठी आयोगामार्फत ‘महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६’ ही परीक्षा २७ सप्टेंबरपासून राज्यातील विविध केंद्रांवर ऑनलाइन संगणक प्रणालीवर आधारित पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.
ही पदसंख्या आणि आरक्षणामध्ये सरकारच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार, बदल होण्याची शक्यता असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले. परीक्षेतून भरण्यात येणाऱ्या विविध संवर्गांपैकी जाहिरातीच्या तारखेपर्यंत प्राप्त झालेली पदे जाहिरातीत नमूद केली आहेत. त्या व्यतिरिक्त उर्वरित संवर्गातील पदांचा नंतरच्या टप्प्यावर समावेश होण्याची शक्यता आहे.
त्यानुसार, पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत संबंधित विभागाकडून सुधारित किंवा अतिरिक्त मागणीपत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व पदे, संवर्ग पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील. अशा सुधारित किंवा अतिरिक्त मागणीपत्रांचा तपशील पूर्व परीक्षेचा निकाल प्रसिद्ध करण्यापूर्वी प्रसिद्ध करण्यात येईल. त्याआधारे परीक्षेतून भरल्या जाणाऱ्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येईल, असेही आयोगाने स्पष्ट केले.
अर्ज सादर करण्यासाठी : २७ जून ते १७ जुलै
ऑनलाइन परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत : १७ जुलै
भारतीय स्टेट बॅंकेत चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा कालावधी : १९ जुलै
चलनाद्वारे परीक्षा शुल्क बॅंकेत भरण्याचा अंतिम कालावधी : २० जुलै
एकूण पदे : २ हजार ६१९
Success Story: जुन्नरच्या सिद्धीने गाठले आकाश! अवघ्या २०व्या वर्षी अमेरिकेतून कमर्शियल पायलट बनण्याचा मान, सिद्धी हाडवळेची प्रेरणादायी यशोगाथा..लिपिक-टंकलेखक १,८६४
(मंत्रालयीन व विविध विभाग)
कर साहाय्यक २८२
(वित्त विभाग) तांत्रिक साहाय्यक ३
(वित्त विभाग) साहाय्यक मोटार वाहन निरीक्षक ४६१ (गट क)
(गृह विभाग) उद्योग निरीक्षक ९
(उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग)