Maharashtra News Live Update: रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला
Saam TV June 26, 2026 02:45 PM
गडचिरोलीत अवैध वाळू उपशाचा बळी; सिंड्राई रेतीघाटावर मजुराचा मृत्यू

देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा परिसरातील सिंड्राई रेतीघाटावर अवैध वाळू उपशादरम्यान ३४ वर्षीय मजूर विलास महादेव देवढगले राहणार जुनी वडसा यांचा यंत्राखाली दबून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना २५ जून रोजी सकाळी घडली.

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 14 मिलिमिटर पाऊस,

रत्नागिरी तालुक्यात सर्वात जास्त 49 मिलिमिटर पाऊस

आज कोकणासाठी पावसाचा यलो अलर्ट

कोकण किनारपट्टी भागात पावसाचा जोर अधीक असण्याची शक्यता

किनारपट्टी भागात ताशी 30 ते 40 किलोमिटर वेगाने वारे वाहणार

शेतकऱ्यांचा कृषी अधिकाऱ्यांना घेराव; युरिया तुटवडा की काळाबाजार? पवन मावळातील बळीराजा संतप्त!"

एकीकडे उशिराने सुरू झालेल्या पावसामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे, तर दुसरीकडे २६६ रुपयांची युरियाची बॅग ३०० ते ३५० रुपयांना विकली जात आहे, कृत्रिम खतटंचाई निर्माण केल्याचा आरोप पवन मावळातील शेतकऱ्यांनी केला आहे. कृषी सेवा केंद्रावर युरिया उपलब्ध असूनही तो दिला जात नसल्याचा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी थेट कृषी अधिकाऱ्यांनाच घेराव घालत जाब विचारला.

Mayank Murder Case : मयांक लोहार हत्याप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कुटुंबीयांना दिलासा

मयांक लोहार हत्याप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कुटुंबीयांना दिलासा

मयांकला न्याय मिळवून देऊ" – एकनाथ शिंदे यांची वडिलांशी फोनवर चर्चा

Sindhudurg : स्मार्ट मीटर विरोधात ठाकरे सेनेची महावितरण कार्यालयावर धडक

कुडाळ येथील महावितरण कार्यालयावर माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने धडक देत स्मार्ट वीज मीटर, वाढीव वीज बिले आणि धोकादायक भूमिगत वीज वाहिन्यांबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला. अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांच्याशी झालेल्या चर्चेत स्मार्ट मीटरची सक्ती थांबवावी, अशी मागणी करण्यात आली.

Dharashiv : बोगस खते-बियाणे विक्रेत्यांवर 'मकोका'ची मागणी - आमदार प्रवीण स्वामी

बोगस खते-बियाणे विक्रेत्यांवर 'मकोका'ची मागणी

बोगस खते-बियाणे उत्पादक आणि विक्रेत्यांविरोधात कडक कायद्याची ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामींची विधानसभेत मागणी

Virar Fire : विरारमध्ये अग्नितांडव! पुष्प प्लाझा इमारतीमधील पहिल्या माळ्यावर भीषण आग

विरार पूर्व स्टेशन जवळील पुष्प प्लाझा इमारतीमधील पहिल्या माळ्यावर एका ऑफिस मध्ये भीषण आग लागण्याची घटना घडली

गुरुवारी रात्री साडे अकरा च्या सुमारास ही आग लागली असून, आगीचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

घटनेची माहिती मिळताच वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जाणांनी घटनास्थळावर पोहचून काही तासातच आगीवर नियत्रण मिळवले

Accident : वाशिममध्ये नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्सचा अपघात

वाशीम शहराजवळील रेल्वे उड्डाण पुलाजवळ खुराणा ट्रॅव्हल्सच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव ट्रॅव्हल्स भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.

डिव्हायडर ओलांडून रस्त्याच्या काठावर असलेल्या टिन पत्र्यांच्या दुकानांचा चुराडा करत खाली उतरली.

Nashik : नाशिक जिल्ह्यातील पावसाळी पर्यटन स्थळांवर यंदा कडक निर्बंध

- नाशिक जिल्ह्यातील पावसाळी पर्यटन स्थळांवर यंदा कडक निर्बंध

- विशेषतः त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्रातील पर्यटनस्थळांवर असणार कडक निर्बंध

- नियमभंग करणाऱ्यांवर वन विभागाची होणार कारवाई

Yavtmal : मंदिरातून चांदीसह चार लाखांचा मुद्देमाल लंपास

यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील मानकी आंबा येथील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत उद्धवबाबा मंदिरात अज्ञात चोरट्यांनी दरवाजा तोडून प्रवेश करत साडेपाच किलो चांदीच्या वस्तू आणि दानपेटीतील ६० हजार रुपये असा एकूण अंदाजे चार लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

ही संपूर्ण घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून,चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर दारव्हा पोलिसांनी गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

Dharashiv : धाराशिव जिल्ह्यात सर्वात मोठी जुगारविरोधी कारवाई

धाराशिवच्या कळंब शहरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखा आणि कळंब पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मोठी धाड टाकली.

या कारवाईत जुगार खेळताना अनेकांना ताब्यात घेण्यात आले असून, एकूण ५९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनास्थळावरून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य आणि अन्य 19 लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Sangali : सांगली महापालिकेच्या शाळेत जाऊन महापौरांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

सांगली महापालिका क्षेत्रातल्या शाळांच्या महापौरंकडून पाहणी करण्यात आली आहे.

मिरजेतील महापालिकेच्या शाळेमध्ये महापौर धीरज सूर्यवंशी यांनी अचानक जाऊन भेट दिली.

यावेळी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिक्षणाचा आढावा थेट विद्यार्थ्यांच्याकडूनच महापौर धीरज सूर्यवंशी यांनी घेतला.

राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त फलक रेखाटन करत त्यांना अभिवादन

समाजातील सर्व घटकांना प्रगतीची समान संधी उपलब्ध व्हावी म्हणून सामाजिक समतेसाठी आरक्षणाचा कायदा करणारा पहिला राजा.शिक्षण,संस्कृती,कला,क्रिडा या श्रेष्ठ गोष्टींना राजाश्रय देणारा व अंध्दश्रध्दे वर प्रहार करणारा लोकांचा राजा म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त चांदवडच्या कला शिक्षक देव हिरे यांनी रंगीत खडूंच्या माध्यमातून फलक रेखाटन करत त्यांना अभिवादन केले आहे.

MPSC News : एमपीएससी कडून परीक्षार्थींना कागदपत्रासाठी मुदतवाढ 27 जून पर्यंत संधी

एमपीएससी (MPSC Exam) कडून परीक्षार्थींना कागदपत्रासाठी मुदतवाढ 27 जून पर्यंत संधी

एमपीएससी कडून सेवेतील पदभरतीसाठी वैद्य प्रमाणपत्र कागदपत्र सादर न केलेल्या उमेदवारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे

27 जून पर्यंत कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे अन्यथा भरती प्रक्रियेसाठी त्यांचा विचार केला जाणार नाही

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.