मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) यांच्या वतीने आषाढी एकादशी आणि पंढरपूर वारीच्या निमित्ताने यंदा ५,५०० हून अधिक विशेष बसेस चालवल्या जाणार आहे.
यंदा विठ्ठल भक्तांसाठी तब्बल ५,५०० विशेष एसटी बसेस सोडण्याचे मोठे नियोजन केले आहे. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी नुकतीच ही घोषणा केली. राज्यातील कोणत्याही गावातील ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी एकत्र येऊन मागणी केल्यास, त्यांच्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाईल. अशी घोषणा करण्यात आली आहे. तसेच शासनाच्या सर्व नियमित प्रवासी सवलती या विशेष बसेसना देखील लागू राहतील.
महिला सन्मान योजना: महिला प्रवाशांना तिकीट दरात ५०% सवलत मिळेल.
अमृत ज्येष्ठ नागरिक योजना: ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सोय असेल
ALSO READ: गोंदियात नागपूर-मुंबई दुरंतो एक्सप्रेस मध्ये महिलेने बाळाला जन्म दिला
पंढरपुरातील गर्दी नियंत्रित करण्यासाठी चंद्रभागा, भीमा (देगाव), विठ्ठल कारखाना आणि पांडुरंग (आयटीआय कॉलेज) अशी ४ तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार असून या सर्व तात्पुरत्या स्थानकांवर पिण्याचे शुद्ध पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र आणि चौकशी कक्ष सज्ज असतील. तसेच मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा बसेसच्या संख्येत ३०० ने वाढ करण्यात आली आहे, जेणेकरून वाढत्या गर्दीतही प्रवाशांची गैरसोय होणार नाही.
ALSO READ: महाराष्ट्र मुद्रांक शुल्क घोटाळा प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांना बडतर्फ करणार-महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे
Edited By- Dhanashri Naik