केतन अग्रवालला धक्का दिल्यानंतर सियाच्या तोंडातून निघाले ते शब्द, पहिल्या 5 मिनिटांमध्ये लोहगडावर नेमकं काय घडलं?
Tv9 Marathi June 27, 2026 01:45 AM

पुण्याचा रहिवासी असलेल्या व्यावसायिक केतन अग्रवाल याच्या हत्याप्रकरणाने संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. केतन अग्रवाल याची हत्या त्याची होणारी पत्नी सिया गोयल हिनेच केल्याचं समोर आलं आहे. सिया गोयल हिने आपल्या प्रियकराच्या मदतीने केतनच्या हत्येचा प्लॅन बनवला आणि त्याला लोहगडावर बोलून त्याची हत्या केली. सुरुवातीला हा अपघाती मृत्यू आहे, असंच सर्वांना वाटत होतं. मात्र त्यानंतर पोलीस चौकशीमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. केतनच्या होणाऱ्या पत्नीने सियानेच त्याची हत्या केली. दरम्यान 18 जून रोजी ही घटना घडली होती. जेव्हा ही घटना घडली त्यापूर्वी आणि त्यानंतर नेमकं काय घडलं याबाबत आता तेथील सुरक्षा रक्षक धीरज जाधव यांनी माहिती दिली आहे.

धीरज जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा ही घटना घडली तेव्हा ते ड्युटीवर होते. त्यावेळी त्यांना कोणाच्या तरी ओरडण्याचा आवाज आला. आवाज आल्यानंतर ते घटनास्थळी तातडीने पोहोचले. जेव्हा धीरज जाधव हे घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांनी पर्यटकांना तिथे काय घडलं याबाबत विचारलं. तेव्हा पर्यटकांनी मला सांगितलं की कोणीतरी दरीत कोसळलं आहे. त्यावेळी सिया खूप घाबरलेली होती, आणि मदतीसाठी आवाज देत होती. त्यानंतर मी तातडीने या घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली, घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले, अशी माहिती यावेळी सुरक्षा रक्षकाने दिली आहे.

केतनला धक्का दिल्यानंतर सिया काय म्हणाली?

सुरक्षा रक्षकाने दिलेल्या माहितीनुसार या घटनेनंतर सियाने जोरात आरडा ओरड करण्यास सुरुवात केली, आणि असं नाटक केलं की हा एक अपघात होता. ही घटना घडल्यानंतर सिया गोयलने सर्वात पहिल्यांना मदतीसाठी आरडाओरड केली. जेव्हा मी तिच्याकडे पाहिलं तेव्हा मला असं वाटलं की ती खूप घाबरलेली होती. त्यानंतर मी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीला असं वाटतच नव्हतं की ही हत्या असावी असं धीरज जाधव यांनी म्हटलं आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.