Why India lost to Ireland in the first T20I? विश्वविजेता भारतीय संघ दुबळ्या आयर्लंडकडून हरला... यावर कुणाचा विश्वास बसेल? पण, होय शुक्रवारी बेलफास्ट येथील पहिल्याच ट्वेंटी-२०त भारताला हार पत्करावी लागली आणि आयर्लंडविरुद्ध ११ आंतरराष्ट्रीय सामन्यांची अपराजित मालिका खंडीत झाली. २०२३ नंतर भारतीय संघाला प्रथमच ट्वेंटी-२० मालिका आता जिंकता येणार नाही. भारत-आयर्लंड यांच्यातला दुसरा सामना रविवारी होणार आहे आणि त्यात भारतीय संघ चुका सुधारण्याचा नक्की प्रयत्न करतील. पण, पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) काय म्हणाला ते वाचा..
आयर्लंडने लॉर्कन टकर ( ५०) व गॅरेथ डेलनी ( ४९) यांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर ४ बाद ५१ वरून ९ बाद १८२ धावांपर्यंत मजल मारली. हर्षित राणाने त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीची नोंद करताना २४ धावांत ३ विकेट्स घेतल्या. अर्शदीप सिंग व अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २ बळी टिपले. संजू सॅमसन ( ५), इशान किशन ( १) व कर्णधार श्रेयस ( ३) यांना अपयश आले असले तरी अभिषेक शर्माने मैदान गाजवले. त्याने २० चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ५० धावा केल्या. त्यानंतर तिलक वर्मा ( १९), शिवम दुबे ( २५) व अक्षर पटेल ( १५) यांना विजय मिळवून देता आला नाही.
IND vs IRE 1st T20I: धक्कादायक! विश्वविजेता भारत हरला; आयर्लंडने करेक्ट कार्यक्रम केला, श्रेयसच्या नेतृत्वाची खराब सुरुवात; नेमकं काय घडलं?आयर्लंडच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करताना भारताला १८.५ षटकांत १४८ धावांवर गुंडाळले. आयर्लंडने ३४ धावांनी विजय मिळवला. त्यांच्याकडून मॅथ्यू हम्प्रेयस ( ३-३८) व मॅथ्या हॉलार्ड ( ३-२८) यांच्यासह जय मुंद्राने २ विकेट्स घेत सामन्याला कलाटणी दिली. या पराभवानंतर भारताचा कर्णधार श्रेयस म्हणाला, भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीला चांगला मारा केला. त्यांना चेंडू स्विंग होताना दिसत होता आणि त्यांनी काही बळीही मिळवले. त्यामुळे आम्हाला जबरदस्त सुरुवात मिळाली, पण मधल्या काळात आमची लय बिघडली. त्याचाच फायदा घेताना त्यांनी सरळ फटके मारून डावाला आकार दिला.जेव्हा धावांवर अंकुश ठेवायचा होता, तेव्हा गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. त्यामुळे आम्ही १४० धावा अपेक्षित करत होतो.
तो पुढे म्हणाला, कर्णधार म्हणून ही नक्कीच चांगली सुरुवात नाही. जे घडले ते आम्ही विसरून जाऊ. या सामन्यातून नक्कीच खूप काही शिकण्यासारखे आहे आणि पुढच्या सामन्यात आम्ही पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरू याची खात्री करू. हर्षित राणा आणि शिवम दुबे यांना सुरुवातीला खेळपट्टीकडून मदत मिळत होती आणि शिवमने यापूर्वीही महत्त्वाच्या षटकांमध्ये गोलंदाजी केली आहे. त्यामुळे मी नेहमीच त्याच्यावर विश्वास ठेवतो; मी त्याच्यासोबत देशांतर्गत क्रिकेटमध्येही खेळलो आहे. मला त्याच्या जमेच्या बाजू आणि कमकुवत दुवे माहित आहेत. आणि हर्षित राणाने तर अप्रतिम गोलंदाजी केली.
IND vs IRE 1st T20I: श्रेयस अय्यरने कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात रोहित शर्माचे दोन विक्रम मोडले; आयर्लंडला गोलंदाजांनी रडवलेमला वाटते की तुम्ही कशालाही गृहीत धरू शकत नाही. तुम्ही फक्त मैदानात उतरून सामने जिंकू शकत नाही. तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतात आणि त्या क्षणात पूर्णपणे सहभागी राहावे लागते. मी आधी म्हटल्याप्रमाणे, तुम्हाला वर्तमानात जगावे लागेल आणि जर प्रतिस्पर्ध्यावर दबाव टाकण्याची संधी मिळाली, तर ती साधली पाहिजे. आणि हो, कोणताही क्षण किंवा परिस्थिती कधीही हलक्यात घेऊ नका. पुढच्या सामन्यात पुनरागमनासाठी आम्ही उत्सुक आहोत, असेही त्याने म्हटले.