Photo – उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी निष्ठावंतांची गर्दी; नागपूर विमानतळावर जंगी स्वागत
Marathi June 27, 2026 03:25 AM

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नागपूर विमानतळ येथे विदर्भातील शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमी जनतेकडून जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी नागपूर विमानतळावर निष्ठावंत शिवसैनिकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. यावेळी शिवसेना झिंदाबाद, जय भवानी जय शिवाजी, उद्धव साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला होता. उद्धव ठाकरे यांचा शनिवार, 27 जूनपासून महाराष्ट्र दौरा सुरू होणार असून यवतमाळ, वाशीम, हिंगोली, परभणी शहर, धाराशीव शहर आणि शिर्डी येथे मतदारांशी संवाद साधणार आहेत. शिवसेनेशी बेइमानी करणाऱ्या फुटीर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या झंझावाती सभादेखील होणार आहेत. या दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात आली असून गद्दारांचा हिशेब चुकता करणार असल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे. ‘फुटीने आकडे बदलतात, निष्ठा नाही…’ असा संदेशच या दौऱ्यातून दिला जाणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.