आधी NEET अन् आता TET; महाराष्ट्रात पुन्हा पेपरफुटीचं ग्रहण, ठाण्यात पेपर लीक झाल्याने परीक्षा रद्द, लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य पुन्हा टांगणीला
esakal June 27, 2026 05:45 PM

पेपरफुटीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसतानाच आता महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. ठाण्यात टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, खबरदारीचा उपाय म्हणून उद्या (२८ जून) होणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ठाणे परिसरातून प्रश्नपत्रिका लीक झाल्याची माहिती संबंधित यंत्रणांना मिळाल्यानंतर प्रशासनाने तातडीने हा निर्णय घेतला. या घटनेमुळे राज्यभरातील लाखो उमेदवारांचा हिरमोड झाला असून, अनेक विद्यार्थी परीक्षा केंद्रांकडे जाण्याची तयारी करत असतानाच त्यांना परीक्षा रद्द झाल्याची माहिती मिळा

NEET Paper Leak Case: मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलमध्ये 'गॉड' नावाने कुणाचा नंबर? संशयास्पद संवाद सीबीआयच्या हाती

टीईटी परीक्षा ही शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो तरुणांसाठी महत्त्वाची मानली जाते. अनेक उमेदवारांनी महिनोनमहिने अभ्यास करून या परीक्षेची तयारी केली होती. मात्र, पेपरफुटीच्या संशयामुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Maharashtra Board Exam Paper : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा ! प्रश्नपत्रिका आता फक्त ३-४ पानांचीच, मंडळाची १८ कोटींची बचतही होणार

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नीट (NEET) परीक्षेतील कथित पेपरफुटीमुळे देशभरात मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता महाराष्ट्रातही अशाच प्रकारची घटना समोर आल्याने परीक्षा व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, पेपरफुटीमागील नेमके कारण आणि जबाबदार व्यक्तींचा शोध घेण्याचे काम संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. नव्या परीक्षेच्या तारखेबाबत अधिकृत घोषणा लवकरच अपेक्षित आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.