तुम्ही जर पासपोर्ट काढण्याचा विचार करत असाल, तर पुढच्या महिन्यापासून पासपोर्ट काढणे महाग होणार आहे. सरकारने जवळपास 14 वर्षांत पहिल्यांदाच पासपोर्ट शुल्कात वाढ केली आहे. 1 जुलै 2026 पासून तुम्हाला नवीन पासपोर्टसाठी 1000 ते 2500 रुपये अधिक खर्च करावे लागतील. तुम्ही पहिल्यांदा पासपोर्टसाठी अर्ज करत असाल, जुन्या पासपोर्टचे रिन्यू करत असाल, हरवलेल्या पासपोर्टच्या जागी नवीन पासपोर्ट काढत असाल किंवा तुमच्या मुलांसाठी पासपोर्ट काढत असाल, प्रत्येक प्रकारात शुल्कात वाढ करण्यात आली आहे. जर तुम्ही पासपोर्टसाठी अर्ज करण्यास विलंब करत असाल, तर आता कोणताही विलंब न करता तुम्ही आज घरी बसून पासपोर्टसाठी अर्ज करू शकता. चला तर मग घरबसल्या ऑनलाईन पासपोर्ट अर्ज कसा करू शकता ते जाणून घेऊयात.
भारतातील पासपोर्ट शुल्क: 1 जुलैपासून हे नवीन दर लागू होतील.
पासपोर्ट अर्ज करणाऱ्या 18 वर्षे व त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींसाठी आणि 15 ते 18 वर्षे वयोगटातील अल्पवयीन मुलांसाठी, नवीन किंवा पुन्हा जारी केलेल्या 36-पानांच्या पासपोर्टच्या सामान्य प्रक्रियेसाठी सध्याच्या 1हजार 500 रूपये खर्च येत होता, मात्र नवीन दर लागू नंतर 2 हजार 500 रुपये शुल्क आकारले जाईल.
सध्या, तत्काळसाठी 3500 रुपये (36 पानांसाठी) शुल्क आकारले जात होते, मात्र आता 1 जुलैपासून 5000 रुपये खर्च करावे लागतील.
प्रौढ प्रवर्गात 60 पानांचा सामान्य पासपोर्ट बनवून घेतल्यास 2000 रुपये आकारले जातात, परंतु 1 जुलैपासून तुम्हाला 3 हजार 500 रुपये खर्च करावे लागतील.
सध्या 60 पानांच्या इन्स्टंट पासपोर्टसाठी 4000 रुपये शुल्क आकारले जाते होते पण 1 तारखेपासून तुम्हाला 6000 रुपये खर्च करावे लागतील.
तुमचा पासपोर्ट हरवलेला असेकिंवा खराब झालेला असेल आणि तुम्ही तो पुन्हा रिन्यू करण्यासाठी याआधी 36-पानांच्या इन्स्टंट पासपोर्टसाठी 5 हजार रुपये शुल्क आकारले जात होते, परंतु 1 तारखेपासून 7 हजार रुपये आकारले जातील.
अल्पवयीन प्रवर्गात 36 पानांच्या पासपोर्टची (सर्वसाधारण) किंमत 1 हजार रूपये होती, या महिन्याच्या 1 तारखेपासून हे शुल्क 1 हजार 750 रूपये होणार आहे.
अल्पवयीन श्रेणीमध्ये, 36 पानांसाठी (तात्काळ) 3 हजार रुपयांऐवजी 4 हजार 250 रुपये शुल्क आकारले जाईल.
पासपोर्टच्या वैधतेमध्ये कोणताही बदल नाही, सर्वसाधारण पासपोर्ट 10 वर्षांसाठी वैध आहेत, तर अल्पवयीन मुलांचे पासपोर्ट 5 वर्षांसाठी किंवा पासपोर्ट धारक 18 वर्षांचा होईपर्यंत, यापैकी जे आधी येईल तोपर्यंत वैध असतील.
पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा ?
पासपोर्ट सेवा ऑनलाइन पोर्टलला (passportindia.gov.in) भेट द्या.
साइट उघडल्यावर, तुम्हाला क्विक लिंक्स मेनूमध्ये “Apply for passport” हा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक करा.
पुढील पेजवर, Fresh/Re-issue, Tatkal Passport, किंवा Diplomatic/Official Passport असे ऑप्शन तुम्हाला विचारले जाईल की तुम्हाला कोणत्या श्रेणीसाठी अर्ज करायचा आहे, त्यानुसार तुम्ही श्रेणी निवडा.