अभिनेते मुथिन चक्रवर्ती आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या बद्दल कोणाला माहिती नाही असं कोणी नसेल. बॉलिवूडला अनेक हिट सिनेमे देत त्यांनी स्वतःची भक्कम ओळख इंडस्ट्रीमध्ये निर्माण केली. पण एक काळ असा होता, जेव्हा श्रीदेवी आणि मिथुन दा त्यांच्या अफेअरमुळे चर्चेत होते. दोघे एकमेकांना डेट करत होते, हे सर्वांना माहिती आहे. पण श्रीदेवी आणि मिथुन दा तीन महिने नवरा – बायको प्रमाणे राहत होते… हे कोणाला माहिती नसेल.. असं असून देखील दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. याबद्दल देखील मोठं कारण समोर आलं आहे. सांगायचं झालं तर, नुकताच झालेल्या एका मुलाखातीत वरिष्ठ पत्रकार ज्योती वेंकटेश यांनी श्रीदेवी आणि मिथुन दा यांच्या नात्याबद्दल मोठे खुलासे केले आहेत.
ज्योती यांनीश्रीदेवी आणि मिथुन दा यांच्या नात्याबद्दल विचारण्यात आलं, यावर त्या म्हणाल्या, ‘तुम्ही मला दोघांच्या नात्याबद्दल विचारत आहात… श्रीदेवी आणि मिथुन दा, तर 3 महिने लग्न झालेल्या नवरा – बायको प्रमाणे राहत होते… मिथुन दा कायम श्रीदेवी यांना आऊटडोर शुटिंगसाठी घेऊन जायचे. पण श्रीदेवी कधी सेटवर आल्या नाहीत…’
‘त्या हॉटेलच्या खोलीतच थांबायच्या. पण सर्वांना माहिती होतं की, श्रीदेवी, मिथुन दा यांच्या सोबत आहेत. त्यावेळी वेळ मिळाला तेव्हा मस्करीत मिथुन दा यांना विचारलं, तुम्हाला आता तामिळ येत असेल ना? हे सुद्धा मी त्यांना तामिळ भाषेतच विचारलं. त्यानंतर त्यांनी तामिळमध्ये बोलू नकोस… असं मला सांगितलं…’ असं देखली ज्योती म्हणाल्या…
रिलेशनशिपमध्ये असताना देखील दोघांचं लग्न का नाही झालं? असा प्रश्न देखील ज्योती यांना विचारण्यात आला. यावर त्या म्हणाल्या, ‘तेव्हा मिथुन दा यांच्यापेक्षा श्रीदेवी यांची लोकप्रियता खूप होती. श्रीदेवी यशाच्या शिखरावर होत्या आणि मिथुन दा ओळख भक्कम करण्याचा प्रयत्न करत होते. एवढंच नाही तर, तेव्हा अनेक महिलांसोबत मिथुन दा यांच्या नात्याची चर्चा होती… अशात त्यांच्यावर विश्वात ठेवणं फार कठीण होतं. जेव्हा मिथुन दा यांनी योगिता बाली यांच्यासोबत लग्न केलं, तेव्हा लग्न फार काळ टिकणार नाही असंच सर्वांना वाटलं…’
‘पण आजपर्यंत मिथुन दा त्यांच्या बायकोसोबत आनंदी आयुष्य जगत आहेत. त्यांनी तीन मुलं देखील आहेत. एक मुलगी त्यांनी दत्तक घेतली आहे.’ असं देखील ज्योती म्हणाल्या. सांगायचं झालं तर, श्रीदेवी आणि मिथुन दा यांनी कधीच त्यांच्या नात्याचा स्वीकार सर्वांसमोर केला नाही. पण आजही त्यांच्या नात्याच्या चर्चा रंगलेल्या असतात.