Akshay Kumars Welcome to the Jungle Box Office Collection: अक्षय कुमार (Akshay Kumar) स्टारर 'वेलकम टू द जंगल' (Welcome to the Jungle) हा सिनेमा काल म्हणजेच 26 जून 2026 रोजी सिनेमागृहांमध्ये रिलीज झाला. या बहुप्रतिक्षित सिनेमाची प्रदर्शित होण्यापूर्वीच चर्चा रंगली होती. (Box Office Collection) पेड प्रिव्ह्यूमधून या सिनेमानं 3.75 कोटींचे कलेक्शन केले होते. आता सिनेमागृहात रिलीज होताच या सिनेमानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला. या सिनेमानं प्रेक्षकांची मने जिंकली. सोशल मीडियावर या सिनेमाचे विशेष कौतुक होत आहे. अहमद खान दिग्दर्शित या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुव्वांधार ओपनिंग केली आहे. पहिल्याच दिवशी म्हणजेच शुक्रवारी या सिनेमानं किती कोटींचे कलेक्शन केले? जाणून घेऊयात.
अक्षय कुमार, दिशा पटानी, जॅकलीन फर्नांडीज स्टारर 'वेलकम टू द जंगल'च्या टीमने बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली आहे. सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्ट्सनुसार, या सिनेमानं पेड प्रिव्ह्यू शोमधून 3.75 कोटींचे कलेक्शन केले आहे. त्यानंतर या सिनेमानं पहिल्याच दिवशी 15.25 कोटींचे कलेक्शन केले आहे. दरम्यान, या कॉमेडी ड्रामा सिनेमानं पहिल्याच दिवशी ओपनिंग डेला अंदाजे 19 कोटींचे कलेक्शन केले आहे. ओपनिंग डेचं कलेक्शन पाहता, या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली असल्याचं दिसून येत आहे.
'वेलकम टू द जंगल' या सिनेमानं केवळ पेड प्रिव्ह्यूमधून 3.75 कोटींचे कलेक्शन केले आहे. त्यामुळे हा सिनेमा या वर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा सहावा सिनेमा ठरला आहे. तसेच, हा सिनेमा या वर्षीचा तिसरा बिग ओपनिंग करणारा सिनेमा ठरला आहे. विशेष म्हणजे या सिनेमानं अनेक विक्रम मोडले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या कॉमेडी ड्रामा सिनेमानं 29 सिनेमांच्या पहिल्या दिवसाच्या कमाईला मागे टाकले आहे.
'वेलकम टू द जंगल' या सिनेमानं 'वेलकम' फ्रँचायझीच्या दोन्ही सिक्वेल्सना मागे टाकले आहे. अक्षय कुमारच्या 'वेलकम' या सिनेमानं पहिल्या दिवशी 3.35 कोटींचे कलेक्शन केले होते. 'वेलकम' या सिनेमाच्या तिसऱ्या पार्टनं पहिल्या दोन पार्ट्सचे ओपनिंग डेच्या रेकॉर्डला मोडले आहे. 'वेलकम बॅक' या सिनेमानं पहिल्या दिवशी 14.50 कोटींचे कलेक्शन केले आहे. दुसऱ्या पार्टच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनलाही या सिनेमानं मागे टाकले आहे. आता विकेंडमध्ये हा सिनेमा किती कोटींचे कलेक्शन करेल, याची माहिती लवकरच समोर येईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
'लफडं तर कुणीच..' गौतमी पाटीलच्या ग्रुपचे कडक नियम, ग्रुपमध्ये काम करण्यासाठी काय आहे अट?