अफगाणिस्तानमध्ये मोठा भूकंप, दिल्ली आणि जम्मू आणि काश्मीरसह उत्तर भारतातील राज्यांना हादरा, लोकांमध्ये भीतीचं वातावरण
एबीपी माझा वेब टीम June 28, 2026 12:13 AM

Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानमध्ये भूकंप झाल्याची घटना घडली आहे. हा भूंकप संध्याकाळी 7 वाजता झाला असून या भूकंपाची तीव्रता 6.2 रिश्टर स्केल होती. दरम्यान, या भूकंपाचे हादरे भारतात देखील अनेक राज्यांना बसले आहेत. दिल्लीपासून काश्मीरपर्यंत या भूकंपाचे धक्के दानवले. 

दिल्ली आणि जम्मू आणि काश्मीरसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के

दिल्ली आणि जम्मू आणि काश्मीरसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. भूकंप निरीक्षणासाठी भारत सरकारची नोडल एजन्सी असलेल्या राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने (NCS) भूकंपाची तीव्रता 6.2 नोंदवली. भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमध्ये असल्याचे मानले जात आहे. रिश्टर स्केलवरील भूकंपाच्या या तीव्रतेमुळे व्हेनेझुएला आणि फिलीपिन्समध्ये अलीकडेच झालेल्या भूकंपांची आठवण झाली एनसीएसनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमध्ये होता. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.2 होती.

काही भागातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण 

भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार, हा भूकंप उत्तर आणि पूर्व अफगाणिस्तानमधील जुर्मच्या 43 किमी दक्षिणेस झाला. या धक्क्यांमुळे राजधानीच्या काही भागांमध्ये घबराट पसरली, ज्यामुळे लोकांना घरे आणि कार्यालयांमधून बाहेर पडावे लागले. व्हेनेझुएलामध्ये काही दिवसांपूर्वीच झालेल्या दोन भूकंपांच्या धक्क्यांनंतर हा भूकंप झाला आहे, ज्यात 920 लोकांचा मृत्यू झाला आणि हजारो लोक जखमी झाले. बुधवारी संध्याकाळी अवघ्या एका मिनिटाच्या अंतराने दोन शक्तिशाली भूकंप झाले, ज्यामुळे दक्षिण अमेरिकेत इमारती कोसळल्या. 50 हजाराहून अधिक लोक बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. अनेक देश व्हेनेझुएलाच्या नागरिकांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, या भूकंपाची खोली जमिनीच्या पृष्ठभागापासून तब्बल 215 किलोमीटर खोल होती. केंद्र अतिशय खोलवर असल्याने या भूकंपाचे धक्के खूप मोठ्या क्षेत्रावर पसरले. अफगाणिस्तान व्यतिरिक्त भारत (उत्तर भारत), पाकिस्तान, चीन, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, किर्गिस्तान आणि तुर्कमेनिस्तान या देशांना भूकंपाचे तीव्र धक्के बसले.

इमारती आणि वित्तहानीचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी राहण्याची शक्यता

भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते, जेव्हा भूकंपाचे केंद्र जमिनीच्या खूप आत (खोलवर) असते, तेव्हा त्याचे धक्के अतिशय विस्तृत प्रदेशात जाणवतात; मात्र, जमिनीच्या वरच्या भागातील इमारती आणि वित्तहानीचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी राहण्याची शक्यता असते. या भूकंपामुळे अद्याप कोणत्याही प्रकारच्या जीवित किंवा वित्तहानीची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दुर्गम डोंगराळ भाग असल्याने प्रशासन नुकसान झाले आहे का, याचा आढावा घेत आहे.

व्हेनेझुएलात अवघ्या 39 सेकंदांच्या अंतराने दोन विनाशकारी भूकंपात आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, हजारांवर जखमी; भूकंपानंतर 60 सेकंद शहर हादरत राहिलं

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.