उल्हासनगरमध्ये शिंदेसेनेला दुसरा मोठा धक्का बसला
नगरसेविका पूजा भोईर अपात्र ठरल्या
जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने पद रद्द झाले
स्थानिक राजकीय समीकरणांवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो
उल्हासनगरमध्ये शिंदेसेनेला दुसरा मोठा धक्का बसला. आणखी एका नगरसेविकेला अपात्र घोषीत करण्यात आले. नगरसेविका पूजा भोईर अपात्र ठरल्या. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचे पद रद्द करण्यात आले. महापालिका आयुक्तांनी हा मोठा निर्णय घेतला. पूजा भोईर यांचे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध असल्यामुळे नगरसेवक पद गेलं. यामुळे उल्हासनगरच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. याआधी विक्की सिंग लबाना यांचे नगरसेवक पद गेले.
Politics : मुख्यमंत्री बदलणार का? काँग्रेस अध्यक्षांचा ऑन द स्पॉट फैसला, राजकीय वर्तुळातील वावटळ शांतउल्हासनगरच्या राजकारणात मोठी घडामोड घडली. शिंदे गटाच्या शिवसेनेला आणखी एक धक्का बसला. शिवसेनेच्या नगरसेविका पूजा भोईर यांना अपात्र घोषित करण्यात आलं आहे. अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर महापालिका आयुक्तांनी हा मोठा निर्णय घेत नगरसेवक पद रद्द केलं आहे.
याआधी शिंदे गटाचे नगरसेवकविक्की सिंग लबाना यांच्यावरही अशीच कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता पूजा भोईर यांचं नगरसेवक पद गेल्याने उल्हासनगरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. आतापर्यंत शिंदे गटाच्या शिवसेनेचे दोन नगरसेवक अपात्र ठरले असून आगामी राजकीय समीकरणांवर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा शिंदेगटासाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
Maharashtra Politics: विमानापेक्षा इमान महत्वाचा...; ठाकरे-फडणवीसांच्या एकत्र विमान प्रवासावरून शिंदे संतापले