कराड (सातारा) : पुणे–बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कराड येथील कोल्हापूर नाका ते नांदलापूर दरम्यान उभारण्यात आलेल्या बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले (Karad Kolhapur Naka Flyover latest update) आहे. या पार्श्वभूमीवर उड्डाणपुलाच्या कोल्हापूर–पुणे मार्गावरील लेनवर रविवारपासून (ता.२८) हलक्या वाहनांची चाचणी स्वरूपातील वाहतूक सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महामार्ग विभागाने दिली आहे.
यापूर्वी उड्डाणपुलाच्या पुणे–कोल्हापूर मार्गावरील लेनवर तीन दिवस हलक्या वाहनांची चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीदरम्यान पुलाची भारवाहक क्षमता, वाहनांच्या वजनामुळे निर्माण होणारे कंपन, तसेच वळणांवरील सुरक्षिततेची तपासणी करण्यात आली.
प्राथमिक चाचणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित लेनवरील वाहतूक काही काळासाठी बंद ठेवून चाचणीत निदर्शनास आलेल्या बाबींवर आवश्यक सुधारणा आणि उर्वरित कामे हाती घेण्यात आली. त्यानंतर त्या लेनवर हलक्या वाहनांसाठी वाहतूक सुरू करण्यात आली.
Shaktipeeth Highway Protest : शक्तिपीठ महामार्गामुळे 182 एकर सुपीक शेती धोक्यात? शेतकऱ्यांनी भर चौकात जाळले सरकारी पत्रक, ऐतवडे खुर्दमध्ये नेमकं काय घडलं?आता दुसऱ्या बाजूच्या कोल्हापूर–पुणे मार्गावरील लेनवर रविवारपासून हलक्या वाहनांची चाचणी वाहतूक सुरू होणार असून, ही चाचणी काही दिवस सुरू राहणार आहे. या कालावधीत पुलाच्या कार्यक्षमतेसह सुरक्षिततेचे निरीक्षण करण्यात येणार आहे.
चाचणी यशस्वी झाल्यानंतर उड्डाणपुलावरील उर्वरित कामे पूर्ण केली जाणार आहेत. त्यामध्ये पथदिव्यांच्या खांबांना वीजजोडणी, संरक्षक कठडे, सुरक्षा बॅरिअर्स, मार्गदर्शक फलक तसेच इतर आवश्यक सुविधा उभारण्याची कामे करण्यात येणार आहेत.
Marleshwar Waterfall Route : मार्लेश्वरला जाण्याचा विचार करताय? मग, 'हा' रस्ता पुढील 4 महिन्यांसाठी पूर्णपणे राहणार बंद; देवस्थानने का घेतला असा निर्णय?महामार्ग विभागाच्या माहितीनुसार, सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर आणि अंतिम तपासणी समाधानकारक ठरल्यानंतर कोल्हापूर नाका उड्डाणपूल सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेने खुला करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.