Bike Seat: बाईकची मागची सीट का असते उंच? काय कारण? रोज दुचाकीवर फिरणाऱ्यांना सुद्धा नाही माहित
Tv9 Marathi June 28, 2026 02:45 AM

Bike Seat high: बाईकचे डिझाईन हे केवळ शोसाठी नसते. त्यात अनेक बारकावे असतात. या डिझाईनमागे सुरक्षा आणि बाईकची कामगिरी गृहित धरली जाते. अनेकदा लोक उंच सीट केवळ स्टाईलचा भाग मानतात. पण त्याचा उद्देश राईड अधिक सुरक्षित आणि संतुलित प्रवास करणे हा आहे. हे डिझाईन न केवळ बाईकला स्थिरता देते. पण लांब आणि वेगवान प्रवासात सुंतलन ठेवते. बाईक नियंत्रित राहण्यासाठी त्याचा वापर होतो.

या कारणामुळे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये काही बदल अत्यंत काळजीपूर्वक केले जातात. त्यामुळे ड्रायव्हर आणि त्याच्या मागे बसलेल्या व्यक्तीचा प्रवास अधिक सुरक्षित होतो. वास्तविक बाईकमागील हा छोटासा बदल लवकर लक्षात येत नाही. तो डिझाईनचाच एक भाग वाटतो. हे एक साधारण फीचर वाटते. पण त्याचे मोठे फायदे हे त्यामागील अभियांत्रिकी करणात आहे. त्यामुळे रायडिंग एक्सपीरियंस पूर्णपणे बदलतो.

समतोल आणि नियंत्रणासाठी खास प्लॅन

उंच सीटचा सर्वात मोठा फायदा बाईकचे वजन संतुलित ठेवण्यासाठी होतो. जेव्हा मागे बसणारी व्यक्ती जेव्हा थोडी उंचीवर असते. तेव्हा बाईकचा गुरूत्वाकर्षण केंद्रबिंदु (center of gravity) सुधारतो. वेगाने प्रवास करता येतो. वळणाच्या रस्त्यावर त्याचा फायदा होतो. दुचाकीवरील नियंत्रण सुटण्याची भीती नसते. घसरण्याचा धोका अत्यंत कमी होतो. त्यामुळे अनेकदा हेलकावे घेत जाणारी बाईक सुद्धा एका नियंत्रित वेगात गतीने पुढे जाताना दिसते. हा एका उंच सीटचा फायदा मानल्या जातो.

मागील व्यक्तीला दिसतो समोरचा रस्ता

या डिझाईनचा अजून एक फायदा म्हणजे दृश्यमानता चांगली असते. मागील व्यक्तीला सुद्धा समोरचा रस्ता स्पष्टपणे दिसतो. त्यामुळे मागील व्यक्तीला असुरक्षित वाटत नाही. ती व्यक्ती जास्त अलर्ट आणि आरामदायक वाटते. दूरच्या प्रवास सुद्धा आठवत नाही. मागील व्यक्तीला बाईकवर भीती कमी वाटते.

सरळ सीट असेल तर मागील व्यक्तीचा बागायती रुमाल, ओढणी मागील चाकात फसण्याची भीती असते. ओढणी चाकात अडकून अपघाताचे अनेक प्रकार घडले आहेत. सीट थोडे उंच असेल तर हा धोका कमी होतो. अपघाताचे प्रमाण कमी होते.

या डिझाईनचा एक मोठा फायदा मागील बसलेल्या व्यक्तीला होतो. सस्पेन्स सिस्टिमवर ताण येत नाही. खराब रस्ते, खड्डे आणि स्पीड ब्रेकरमुळे होणारे धक्के उंच सीटवर बसलेल्या व्यक्तीला जाणवत नाही.परिणामी पाठीला, कंबरेला आणि मानेला बसणारे झटके कमी होतात. पाठदुखी, कंबरदुखी आणि मानदुखीचा त्रास कमी होतो.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.