बारामती - महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (MHT-CET) २०२६ च्या पीसीएम (फिजिक्स, केमिस्ट्री व मॅथ्स) गटात बारामतीच्या मोशन अकादमीच्या दोन विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाइल मिळवून देदीप्यमान यश संपादन केले. राज्यातील अवघ्या १२ गुणवंतांच्या यादीत आदित्य अनिल तोरवे आणि सुजल संतोष जाधव यांनी स्थान पटकावले आहे.
मे महिन्यात झालेल्या या परीक्षेसाठी राज्यभरातून ३ लाख २१ हजार ९२८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २ लाख ८५ हजार १२१ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. या अटीतटीच्या स्पर्धेत बारामतीच्या दोन विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.
संस्थेचे संचालक संदीप पवार यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना, 'राज्यातील अवघ्या १२ विद्यार्थ्यांमध्ये आमच्या संस्थेच्या दोन विद्यार्थ्यांचा समावेश होणे ही संपूर्ण बारामतीसाठी अभिमानाची बाब आहे. हे यश विद्यार्थ्यांच्या मेहनतीबरोबरच शिक्षकांच्या समर्पित मार्गदर्शनाचे फलित आहे,' असे सांगितले.
सातत्यपूर्ण अभ्यास व शिक्षकांचे मार्गदर्शन हेच यशाचे रहस्य आहे.
- आदित्य तोरवे, यशस्वी विद्यार्थी
हे यश आई-वडील आणि मोशन परिवाराला समर्पित करतो आहे.
- सुजल जाधव, यशस्वी विद्यार्थी