Rain Update : तो धो धो कोसळणार, महाराष्ट्रात पावसाचा मोठा इशारा, पुढील 24 तास..
admin June 28, 2026 10:24 AM
[ad_1]

राज्यात मॉन्सूनचा पाऊस दाखल झाला. राज्यातील जवळपास सर्वच भागात मॉन्सूनचा पाऊस कोसळत आहे. मात्र, अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही. राज्यात आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. कोकणात काही भागात जोरदार पाऊस हजेरी लावताना दिसतोय. मात्र, राज्यातील इतर भागात पाऊस म्हणावा तसा कोसळत नाहीये. आज मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेशमध्ये मॉन्सूनने चांगली वाटचाल केली. गेल्या दोन दिवसांपासून मॉन्सूनचा जोर कमी होताना दिसत आहे. आज सकाळपासून काही भागात पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. पुढील 8 दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुंबई, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात आज अलर्ट जारी करण्यात आला. अनेक जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाईचे मोठे संकट आहे.

पुढील काही दिवसात जोरदार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. मात्र, अनेक जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाई हे मोठे संकट आहे. जून महिना कोरडाच केला असून नाशिक जिल्ह्यात केवळ 17 टक्के पाऊस झाला. जिल्ह्यात जूनमध्ये सरासरी 151.1 मिलिमीटर पाऊस अपेक्षित मात्र केवळ 27.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. ही नोंद जून महिन्याच्या सरासरीच्या फक्त 17.9 टक्केच आहे. खरीप हंगाम, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि बागायती पिकांचे नियोजन यावर मोठे संकट उभे राहण्याची चिन्हे आहेत.

पावसा अभावी शेतकरी पेरणीच्या प्रतीक्षेत, अनेक भागांत जमीन अद्याप कोरडीच आहे. राज्याच्या बहुतांश भागात मान्सूनने दमदार हजेरी लावत दिलासा दिला असताना खेड तालुक्यात मात्र, पावसाने पाठ फिरवली आहे. आकाशात दिवसभर काळे ढग दाटून येतात, विजांचा कडकडाटही होतो. मात्र, प्रत्यक्षात पावसाचे दोन थेंबही जमिनीवर पडत नसल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे.

परिणामी शेतकरी वर्ग चिंतेत असून पेरण्या मोठ्या प्रमाणात रखडल्या आहेत. पेरण्यांना जसा पाऊस पाहिजे, तसा पाऊस अद्यापही झाला नाही. शेतकरी चिंतेत आहेत. मोठ्या पावसाची प्रतिक्षा अजूनही शेतकऱ्यांना असल्याचे बघायला मिळतंय. पुढील दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.


[ad_2]
Source link
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.