बुलडाणा: जून महीना आता संपत आला असून जिल्ह्यात केवळ ७३.६ मि.मी.असून ती सरासरीच्या ५२.८ टक्के पाऊस कोसळल्याची नोंद झाली करण्यात आली आहे. शेतीची मशागतीची कामे आटोपून दीर्घ प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना उशीराने का होईना, पावसाने दिलासा दिला आहे. तरी जून अखेरपर्यंत चांगला पाऊस झालेला नाही. त्यामुळे अजूनही पेरणी रखडली आहे. खरीपासाठी कृषी विभागाने पेरणीचे नियोजन केलेल्या जिल्ह्यातील ७ लाख ३८ हजार ३०० हेक्टर क्षेत्राला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पावसाने कुठे धुआधार तर कुठे जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये वातावरण आहे. आनंदाचे बुधबार, २४ जूनच्या सकाळपर्यंत जिल्ह्यात ७३.६ मि.मी. पाऊस कोसळल्याची नोंद झाली असून, हा पाऊस पेरणीसाठी योग्य मानला जातो. या पावसामुळे काही भागातील शेतकऱ्यांनी पेरणीला सुरूवात केली आहे.खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा झाल्याशिवाय सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कपाशी आदी पिकांची पेरणी करू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.
Accident News: राजगडाच्या वाटेवर दुर्दैवी दुर्घटना; पाबे घाटात मिनी बस दरीत कोसळली, दोन जणांचा मृत्यू...कृषी विभागाच्या माहितीनुसार,शेतातील जमिनीमध्ये किमान ६ इंच ओलावा अथवा ७५ ते १०० मि.मी. पाऊस झाल्यानंतरच पेरणी करणे आवश्यक आहे. पुरेसा ओलावा नसताना घाईघाईने पेरणी केल्यास जमिनीतील उष्णतेमुळे बियाण्याचे अंकुरण कमी होण्याची किंवा अंकुर जळण्याची शक्यता असते.त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि आर्थिक खर्च वाढण्याची शक्यता असल्याने कृषी विभागाने सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. काही ठिकाणी शेतकरी धूळपेरणी करत असल्याचे निदर्शनास आले असून, अशा प्रकारची घाई टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सरासरी ७४ मि.मी. पावसाची नोंदजिल्ह्यात शनिवार (२७ जून) रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसामुळे यंदाच्या हंगामात आतापर्यंत सरासरी ७४.० मि.मी. पावसाची नोंद झाली असून, ती जिल्ह्याच्या सरासरी पर्जन्यमानाच्या ९.७१ टक्के आहे. शुक्रवारी (२६ जून)च्या अहवालानंतर गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ६.४ मि.मी. पावसाची भर पडली आहे. आज अखेरच्या नोंदीनुसार मोताळा तालुक्यात सर्वाधिक ९४.४ मि.मी. (१३.२५ टक्के) पाऊस झाला आहे. त्यापाठोपाठ जळगाव जामोद ९५.२ मि.मी. (१३.४६ टक्के), मेहकर ९४.५ मि.मी. (११.२७ टक्के), बुलढाणा ८६.४ मि.मी. (१०.०४ टक्के), नांदुरा ७५.४ मि.मी. (१०.१० टक्के) आणि शेगाव ६९.९ मि.मी. (१०.२४ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. महसूल विभागाच्या वर्तुळनिहाय नोंदीनुसार जिल्ह्यातील काही भागांत गेल्या दोन दिवसांत चांगला पाऊस झाला असून, त्यामुळे अनेक तालुक्यांतील पर्जन्यमानात वाढ झाली आहे.
Women's T20 World Cup: भारत-ऑस्ट्रेलिया आज आमनेसामने; पराभवानंतरही टीम इंडिया सेमीफायनल गाठू शकते? समजून घ्या संपूर्ण गणित!"जिल्ह्यात सध्या समाधानकारक पावसाची सुरुवात झाली असून, पावसाची स्थिती लक्षात घेऊनच पेरणीचे नियोजन करावे. जमिनीतील उष्णता कमी होऊन आवश्यक ओलावा निर्माण झाल्यानंतर सर्व प्रकारच्या खरीप पिकांची पेरणी करता येईल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे,"
- संतोष डाबरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,बुलडाणा