Why Aakash Chopra opposed Vaibhav Suryavanshi selection: भारत आणि आयर्लंड यांच्यातील दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला ३४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
या पराभवानंतर युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीला दुसऱ्या सामन्यात पदार्पणाची संधी मिळणार का, याची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे. मात्र, भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने याबाबत आपले मत मांडले, संघ व्यवस्थापनाने प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल करू नये, असे सांगितले आहे.
पहिल्या सामन्यात अभिषेक शर्माने ४९ धावांची धडकेबाज खेळी केली. मात्र, त्याच्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही भारतीय फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. इशान किशन, संजू सॅमसन आणि टिळक वर्मा हे तिघेही अपयशी ठरले. त्यामुळे वैभव सूर्यवंशीला संधी देण्याची मागणी होत असताना आता आकाश चोप्राने आपल मत व्यक्त केल.
'तू ज्यादा...'; या एका वाक्याने वैभव सूर्यवंशी पेटला, फायनलमध्ये श्रीलंकेच्या गोलंदाजांना चोप दिला, मॅचपूर्वी नेमकं काय घडलं? काय म्हणाला आकाश चोप्रा?आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना आकाश चोप्रा म्हणाला, "इशान किशन आणि संजू सॅमसन दोघेही धावा करू शकले नाहीत. विशेषतः मला संजू सॅमसनबद्दल थोडी चिंता वाटते. जर वैभव सूर्यवंशीला संधी द्यायची असेल, तर संजू किंवा इशान यांच्यापैकी एकाला बाहेर बसवावे लागेल. संघ हरल्यानंतर बाहेर बसलेला खेळाडू अधिक चांगला वाटू लागतो. सगळ्यांना वाटतं की तो आला तर सामना जिंकून देईल, पण त्याची कोणतीही हमी नसते."
तो पुढे म्हणाला, "इशान किशनने नुकतेच वनडेमध्ये शतक झळकावले आहे. त्यामुळे त्याला अधिक संधी मिळतील. संजूचे नशीब सध्या साथ देत नाही. मात्र, पुढच्या सामन्यात तो धावा करेल, अशी मला आशा आहे."
मी असतो, तर वैभवला खेळवलं नसतं'आकाश चोप्राने स्पष्ट शब्दांत सांगितले की, "हे मत काहींना आवडणार नाही, पण मी अजूनही वैभव सूर्यवंशीला प्लेइंग-११ मध्ये स्थान दिले नसते. मी संजू सॅमसन किंवा इशान किशन यांच्यापैकी कोणालाही बाहेर बसवणार नाही. त्याच टॉप-3 सोबत मी पुन्हा मैदानात उतरलो असतो आणि वेगळ्या निकालाची अपेक्षा ठेवली असती. हीच क्रिकेटची पद्धत आहे. पुढच्या सामन्यात हीच फलंदाजी २५० धावाही करू शकते. त्यांच्यात ती क्षमता आहे. आयर्लंडचा संघ तुलनेने कमकुवत असतानाही त्यांनी भारताला हरवत इतिहास रचला आणि हा पराभव भारतीय संघाला निश्चितच लागला असेल."
वैभवची दमदार कामगिरी१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने नुकत्याच झालेल्या श्रीलंकेतल्या तिरंगी मालिकेत भारत 'अ' संघाकडून शानदार कामगिरी केली होती. त्याने अंतिम सामन्यात त्याने अवघ्या २९ चेंडूत ९४ धावांची स्फोटक खेळी केली होती. तसेच श्रीलंका 'अ' विरुद्ध केवळ ११ चेंडूत अर्धशतक झळकावत लिस्ट 'अ' क्रिकेटमधील सर्वात वेगवान अर्धशतकाचा विक्रमही आपल्या नावावर केला.
IPL 2026, Video: एकट्या १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने झुंज दिली, पण संघाने साथ सोडली; अश्विनचा राजस्थान रॉयल्सवर हल्लाबोलयापूर्वी आयपीएल २०२६ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना वैभवने १६ सामन्यांत ७७६ धावा केल्या होत्या. २३७.३० च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करत त्याने एक शतक, पाच अर्धशतके आणि तब्बल ७२ षटकार ठोकले होते. या दमदार कामगिरीच्या जोरावरच त्याला प्रथमच भारतीय संघात स्थान मिळाले आहे.